Volvo Electric Car: Volvo ने आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार केली लॉन्च; एका चार्जवर धावेल 475Km; जाणून घ्या किंमत

Volvo XC40 Car Details in Marathi: आघाडीची कार उत्पादक कंपनी व्होल्वो कार इंडियाने भारतात आपली नवीन कार XC40 रिचार्जचा सिंगल-मोटर व्हॅरिएंट लॉन्च केला आहे.
Volvo XC40 Car: Know Price, Range Details in Marathi
Volvo XC40 Car: Know Price, Range Details in MarathiSaam Tv
Published On

Volvo XC40 Recharge Singe-Motor Variant:

आघाडीची कार उत्पादक कंपनी व्होल्वो कार इंडियाने भारतात आपली नवीन कार XC40 रिचार्जचा सिंगल-मोटर व्हॅरिएंट लॉन्च केला आहे. कंपनीने याची एक्स-शोरूम किंमत 54.95 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीची ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचं बोललं जात आहे. कंपनीच्या आधीच्या मॉडेलपेक्षा ही कार सुमारे 3 लाख रुपये स्वस्त आहे.

कंपनीने याची बुकिंग सुरु केली आहे. ग्राहक कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवर जाऊन ही एसयूव्ही बुक करू शकतात. तसेच ही कार व्होल्वो कार इंडिया बिझनेस पार्टनरकडून देखील बुक केली जाऊ शकते. याच कारच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Volvo XC40 Car: Know Price, Range Details in Marathi
Electric Car: मुंबई-सातारा-मुंबई एका चार्जमध्ये गाठते BYD ची नवीन इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत

किती देते रेंज?

XC40 रिचार्ज सिंगलमध्ये 69kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो मोटरला 236bhp पॉवर आणि 420Nm टॉर्क देतो. याची प्रतिस्पर्धी BMW iX1 प्रमाणे ही कारही 475 किमी पर्यंत रेंज देते, असा दावा कंपनीने केला आहे. याची टॉप स्पीड 180Km/h आहे. ही कार फक्त 7.3 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते.  (Latest Marathi News)

कंपनी या कारवर डिजिटल सेवांसाठी 8 वर्षांची बॅटरी वॉरंटी, 3 वर्षांची कार वॉरंटी, 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज, 3 वर्षांची रोड साईड असिस्टंट आणि 5 वर्षांची मेंबरशिप देखील देत आहे. XC40 रिचार्ज बेंगळुरूमधील होसाकोटे प्लांटमध्ये तयार करण्यात आली आहे.

Volvo XC40 Car: Know Price, Range Details in Marathi
Bandra To Kurla: वांद्रे ते कुर्ला व्हाया बीकेसी धावणार पॉड टॅक्सी, मुंबईकरांनो जाणून घ्या संपूर्ण माहिती

ही कार लॉन्च करताना व्होल्वो कार इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालिका ज्योती मल्होत्रा म्हणाल्या की, 2022 साली लॉन्च करण्यात आलेल्या XC40 रिचार्जच्या प्रचंड यशानंतर आम्ही त्याचे सिंगल-मोटर व्हॅरिएंट आणले आहे. याचा पाया मजबूत करण्यासाठी आणि भारतीय ईव्ही मार्केटमध्ये आपले स्थान बळकट कारण्यासाठी या वाहनाची किंमत कमी ठेवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com