Public Wifi: पब्लिक वायफाय वापरत असाल तर सावधान!अन्यथा, खिसा होईल रिकामा, तो कसा? वाचा

Using Public Wifi Is Safe Or Not: सध्या प्रत्येक ठिकाणी फ्री वायफाय झोन तयार करण्यात आले आहेत. यात रेल्वे स्टेशन, बस स्टॉपवर फ्री वायफाय असते. हे वायफाय वापरणे सुरक्षित आहे की नाही याबाबत अनेकांना प्रश्न पडलेला असतो.
Public Wifi
Public WifiSaam Tv
Published On

सध्या सर्वकाही डिजिटल झाले आहे. प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा वापर करतो. इंटरनेटमुळे आपल्याला कोणतीही माहिती अगदी एका क्लिकवर मिळते. आपण प्रत्येक ठिकाणी इंटरनेटचा वापर करतो. काही सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रेल्वे स्थानक, शॉपिंग कॉम्प्लेक्स, एअर पोर्ट, हॉटेल या ठिकाणी Free Wi Fi झोन तयार करण्यात आले आहेत. परंतु सार्वजनिक ठिकाणी असलेले फ्री वायफाय वापरणे सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

Public Wifi
Lakhpati Didi Scheme: महिलांसाठी खुशखबर! व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देतंय ५ लाखांचे बिनव्याजी कर्ज; काय आहे लखपती दीदी योजना?

पब्लिक वाय फाय हे कधीही महत्त्वाच्या कामासाठी वापरु नये. पब्लिक वाय फाय वापरणे हे असुरक्षित आहे.पब्लिक वायफाय वापरताना नेहमी काळजी घ्यायची असते. यामुळे तुमचा पर्सनल डेटा हॅक होऊ शकतो. त्यामुळे तुमची सर्व वैयक्तिक माहिती चोर होऊ शकते. तुमच्या या वैयक्तिक माहितीचा स्कॅमर्स गैरवापर करु शकतात. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते. कधीही पब्लिक वाय-फायवर तुम्ही बँकिंग अॅक किंवा स्वतः चा पर्सनल ई-मेल आयडीचा वापर करु नये. यामुळे तुमची आर्थिक माहिती चोरी होण्याची शक्यता असते.

Public Wifi
Unified Pension Scheme: शिंदे सरकारचा मोठा निर्णय , केंद्राप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन मिळणार, महाराष्ट्र पहिलेच राज्य!

पब्लिक वायफाय वापरणे सुरक्षित का नाही?

पब्लिक वायफाय वापरण्याचा अधिकार हा सर्वांना असतो. अनेक लोक हा वायफाय वापरु शकतात.यामध्ये स्कॅमर्, फ्रॉड करणारे असण्याची शक्यता असते. त्यामुळे ते वायफायद्वारे तुमचा फोन हॅक करु शकतात. तुम्ही कोणाशी बोलतात किंवा तुमच्या बँकेची माहिती याबाबत सर्व माहिती मिळते. याच माहिती गैरवापर केला जाऊ शकतो.

सायबर क्राइम करणारे स्कॅमर्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये वायरसदेखील टाकू शकतो. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनेक समस्या येऊ शकतात फोन हँग होऊ शकतो. तसेच तुमचे नुकसान होऊ शकते.

पब्लिक वायफाय वापरताना या गोष्टींची काळजी घ्या

  • पब्लिक वायफाय वापरताना कोणत्याही प्रकारचे बँकेचे व्यव्हार करु नये. यामुळे तुमचा डेटा चोरी होऊ शकतो.

  • पब्लिक वायफाय वापरताा सोशल मिडिया अकाउंट्स लॉग इन करु नका. अन्यथा पासवर्ड चोरी होऊ शकतो.

  • पब्लिक वायफायचा वापर करताना कोणत्याही प्रकारच्या अनोळखी व्यक्तीचे व्हॉट्सअॅप कॉल किंवा इंटरनेटवरुन येणारे कॉल उचलू नका.

Public Wifi
Post Office Scheme: महिलांसाठी खास योजना! एकदा गुंतवणूक करा अन् २ वर्षात लखपती व्हा; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com