UPI Payments: 1 फेब्रुवारीपासून तुमचं UPI पेमेंट होणार बंद! कारण काय?

UPI Payment Changes From 1st February: जर तुम्ही UPI पेमेंट वापरत असाल तर तुम्हाला NPCI चे नवीन नियम माहित असले पाहिजेत. तुम्ही नवीन नियमांचे पालन न केल्यास १ फेब्रुवारीपासून तुमच्या UPI आयडीने व्यवहार करू शकणार नाही.
UPI payment
UPI paymentyandex
Published On

अलीकडच्या काळात डिजिटल पेमेंट पद्धत खूपच लोकप्रिय झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून UPIने रोख रकमेची जागा घेतली. आपण प्रत्येक व्यवहारासाठी रोख पैसे न वापरता UPI पेमेंटचा वापर करतो. वाढत्या डिजिटल पेमेंट पद्धतींमुळे ऑनलाइन फसवणूक आणि घोटाळ्यांची प्रकरणे वाढली आहेत आणि काहीवेळा घोटाळेबाज लोकांना लुटण्यासाठी UPI चा वापर करतात.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI व्यवहारांबाबत नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार, आता विशेष अक्षरे (@, #, $, %, आणि इ.) असलेले UPI आयडी अवैध मानले जाणार आहे. जर तुमच्या UPI आयडीमध्ये कोणतेही स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच अक्षरे असतील तर १ फेब्रुवारी २०२५ पासून तुमचे UPI पेमेंट बंद होऊ शकते.

UPI Payments पेमेंट्सवर बंदी

NPCI च्या नवीन नियमांनुसार, काही वापरकर्त्यांसाठी UPI द्वारे व्यवहार बंद केले जातील. तुम्ही विशिष्ट अक्षरांसह तयार केलेल्या UPI आयडीने पेमेंट करू शकणार नाही. व्यवहारादरम्यान, UPI ॲप एक ट्रान्झॅक्शन आयडी जनरेट करते आणि हा आयडी फक्त अल्फान्यूमेरिक म्हणजेच फक्त अक्षरे आणि अंक असलेले आयडी असायला हवे. अन्यथा पेमेंट बंद होऊ शकतं. या बाबतचे परिपत्रक NPCI ने जारी केले आहे. जर UPI आयडी @, #, $ सारख्या विशेष अक्षरांसह तयार केला असेल तर व्यवहार चालणार नाही आणि तो रद्द केला जाईल.

अक्षरे आणि अंक असलेले UPI आयडी वापरु शकता

NPCI च्या नवीन नियमानुसार, १ फेब्रुवारीपासून UPI ​​आयडीमध्ये स्पेशल कॅरेक्टर ठेवण्याची परवानगी नसेल. फक्त अक्षरे आणि अंकांचा समावेश असलेला आयडी अल्फान्यूमेरिक आहे. म्हणून तुम्ही या प्रकारच्या आयडीद्वारे पेमेंट करू शकता. 1 फेब्रुवारी 2025 पासून हा नियम लागू होणार आहे. NPCI ने सर्व पेमेंट ॲप्सना त्यांच्या सेवा नवीन नियमांनुसार अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

UPI payment
Tax Slab : १० लाखांच्या कमाईवर टॅक्स कसा वाचवू शकतो? नव्या अन् जुन्या करप्रणालीत काय फरक?

UPI ID आयडीमध्ये करावा लागेल बदल

NPCI ने 9 जानेवारी रोजी हे परिपत्रक जारी केले होते. ज्यामध्ये या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्या UPI आयडीमध्ये @, !, किंवा # सारखे स्पेशल कॅरेक्टर म्हणजेच अक्षरे असतील तर तुम्ही 1 फेब्रुवारीपासून ते वापरू शकणार नाही. तुमचा व्यवहार आपोआप अयशस्वी होईल. अनेक बँका आणि पेमेंट प्लॅटफॉर्मने या नियमांचे पालन करण्यास सुरूवात केली आहे. UPI व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात येत आहे.

रिझर्व बॅंकच्या अहवालानुसार, RTGS, NEFT, IMPS, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड सारख्या इतर पेमेंट सिस्टमचा हिस्सा ६६ टक्क्यांवरून घसरून १७ टक्क्यांवर आला आहे. देशातील डिजिटल पेमेंट सिस्टम पुढे घेऊन जाण्यात UPI महत्वाची भूमिका बजावत आहे.

UPI payment
What is TDS: टीडीएस म्हणजे काय, रिफंड कसा मिळवाल? कसा तपासाल TDS, जाणून घ्या सर्व माहिती एक क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com