Earbuds: 80 तास चार्ज करण्याची गरज नाही, जबरदस्त आहेत हे इअरबड्स; किंमतही आहे कमी

Truke Clarity Six: तुम्ही दीर्घ बॅटरी लाइफ आणि पॉवरफुल फीचर्स असलेले इअरबड्स शोधत असाल, जे गेमिंगदरम्यानही उपयुक्त ठरतील, तर Truk चे नवीन इअरबड्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात.
Truke Clarity Six
Truke Clarity SixSaam Tv
Published On

Truke Clarity Six Earbuds:

तुम्ही दीर्घ बॅटरी लाइफ आणि पॉवरफुल फीचर्स असलेले इअरबड्स शोधत असाल, जे गेमिंगदरम्यानही उपयुक्त ठरतील, तर Truk चे नवीन इअरबड्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. कंपनीने आपले नवीन TWS इयरबड्स Truke Clarity Six लॉन्च केले आहेत.

हे क्लॅरिटी 5 चे अपडेटेड व्हर्जन आहे, जे ऑगस्ट 2023 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. नवीन इयरबड्समध्ये इन-इअर स्टाइल आहे आणि ते 13 मिमी टायटॅनियम ड्रायव्हर्ससह सुसज्ज आहेत. याची बॅटरी 80 तास चालते, असा कंपनीचा दावा आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Truke Clarity Six
Google ने लॉन्च केला जबरदस्त App! आता तुम्ही स्वतः दुरुस्त करू शकता तुमचा Smartphone, कसा? ते जाणून घ्या

एकसोबत दोन मोबाईलमध्ये होईल कनेक्ट

यात तीन प्रीसेट इक्वेलायझर मोड (डायनॅमिक, मूव्ही आणि बास बूस्ट मोड) आहेत, ज्याच्या मदतीने युजर्स त्यांच्या आवडीनुसार ऑडिओचा चांगला अनुभव घेऊ शकतात. याशिवाय, यात ड्युअल कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट आहे, ज्याच्या मदतीने हे एकाच वेळी दोन मोबाईलमध्ये वापरले जाऊ शकते. इअरबड्समध्ये गेमर्ससाठी 35ms लो-लेटेंसी मोड देखील आहे.  (Latest Marathi News)

इअरबड्स टच कंट्रोलसह येतात आणि व्हॉइस असिस्टंटला देखील सपोर्ट करतात. इयरबड्स ब्लूटूथ व्हर्जन 5.3 वर काम करतात आणि चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हे इअरबड्स पूर्ण चार्ज केल्यावर 10 तास टिकतात, तर केसमध्ये ते एकूण 80 तास चालू रहातात.

किती आहे किंमत?

कंपनीने हे फक्त ब्लॅक रंगात लॉन्च केले आहे. ट्रू क्लॅरिटी सिक्स 26 डिसेंबरपासून फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर 1,299 रुपयांच्या प्रारंभिक किमतीत खरेदीसाठी उपलब्ध असेल. कंपनी यावर 1 वर्षाची वॉरंटीही देत ​​आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com