Google ने लॉन्च केला जबरदस्त App! आता तुम्ही स्वतः दुरुस्त करू शकता तुमचा Smartphone, कसा? ते जाणून घ्या

Google Pixel Diagnostic App: Google वेळोवेळी नवीन फीचर्स आणि अॅप्स सादर करत असतो. आता कंपनीने आपल्या Pixel फोनसाठी एक जबरदस्त अॅप लॉन्च केला आहे. ज्याला कंपनीने Pixel Diagnostic app असे नाव दिले आहे.
Google Pixel Diagnostic App
Google Pixel Diagnostic AppGoogle.com
Published On

Google Pixel Diagnostic App: 

Google वेळोवेळी नवीन फीचर्स आणि अॅप्स सादर करत असतो. आता कंपनीने आपल्या Pixel फोनसाठी एक जबरदस्त अॅप लॉन्च केला आहे. ज्याला कंपनीने Pixel Diagnostic app असे नाव दिले आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्मार्टफोन घरबसल्या रिपेअर करू शकता. अॅपमध्ये प्रत्येक समस्येचे स्टेप बाय स्टेप सोल्यूशन देण्यात आले आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ....

कसं वापरावं हे अॅप?

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने Pixel फोनसाठी रिपेअर मॅन्युअल डिझाइन केले आहे. ते वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या डायल पॅडवर फक्त ##7287## डायल करावे लागेल. असे केल्याने तुम्ही Diagnostic Option पोहोचाल. डायग्नोस्टिक अॅप युजर्सला त्यांच्या डिव्हाइला कोणत्या गोष्टी इफेक्ट करत आहेत, याबाबत सविस्तर माहिती देईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Google Pixel Diagnostic App
OnePlus Smart TV वर जबरदस्त सूट, 15000 रुपयांनी स्वस्त झाला 43 इंच मॉडेल

पिक्सेल डायग्नोस्टिक अॅपमध्ये, युजर्स त्यांच्या डिव्हाइसच्या प्रत्येक फीचर्सची टेस्ट घेऊ शकतात. या एका अॅपद्वारे तुम्ही डिस्प्ले, सेन्सर आणि कनेक्टिव्हिटीपासून फोनचे सर्व पर्याय तपासू शकता. सध्या हे अॅप इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे आणि अॅप सर्व Pixel फोनवर काम करतो.  (Latest Marathi News)

या डायग्नोस्टिक टूल व्यतिरिक्त Google ने ऑल-न्यू डिझाइन फोन दुरुस्ती मॅन्युअल देखील सादर केले आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा स्मार्टफोन घरबसल्या दुरुस्त करू शकता.

Google Pixel Diagnostic App
Flipkart Sale: 50MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज; फक्त 299 रुपयांत घरी घेऊन जा 'हा' स्मार्टफोन

ही मॅन्युअल Google च्या अधिकृत वेबसाइटवर इंग्रजी आणि फ्रेंचमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत. सध्या कंपनीने ते Pixel Fold, Pixel 8 आणि Pixel 8 Pro साठी सादर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com