Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पण बचत होत नाही? ५ स्मार्ट 'सेव्हिंग' टिप्स घ्या जाणून

Ladki Bahin Yojana Money Saving Tips : महाराष्ट्रातील अनेक महिलांना 'माझी लाडकी बहीण योजना' अंतर्गत दरमहिना पैसे मिळतात. या पैशांची सेव्हिंग कशी करायची जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana Money Saving Tips
Ladki Bahin YojanaSAAM TV
Published On

महाराष्ट्रात मोठ्या संख्येने महिला वर्ग 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) हिचा लाभ घेत आहेत. या योजनेच्या अंतर्गत दरमहिना महिलेला 1,500 रुपये दिले जातात. ही योजना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुरू केली आहे.

दरमहिना लाडक्या बहिणीला पैसे तर मिळतात मात्र त्याचा खरा फायदा पैशांची योग्य पद्धतीने सेव्हिंग केल्यावर मिळणार आहे. अनेक महिला मिळालेले पैसे पटकन घर खर्चात वापरून टाकतात. मात्र यातून थोडे थोडे पैसे वाचवून योग्य पद्धतीने सेव्हिंग केल्यास लाडक्या बहिणीला मोठा फायदा होईल. पैसे सेव्हिंग करण्याचे स्मार्ट टिप्स ( Money Saving Tips) आताच जाणून घ्या.

पोस्ट ऑफिस बचत खाते

'थेंबे थेंबे तळे साचे' म्हणतात ते अगदी खरे आहे. पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या अंतर्गत तुम्ही दरमहिना ठराविक रक्कम वाचवू शकता. यात तुम्ही स्वतंत्र खाते उघडू शकता. यात कमी पैसे भरून खाते उघडता येते.

सोन्याची खरेदी

सोन्याचे दर वाढतच जात आहेत. त्यामुळे तुम्ही 'लाडकी बहीण योजना' अंतर्गत मिळालेले पैसे थोडे साठवून एखादा छोटा दागिना खरेदी करू शकता. जेणेकरून भविष्यात तुम्हाला याचा जास्त मोबदला मिळेल. कारण सोन्याचे दर तर वाढतच जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Money Saving Tips
PAN 2.0: इन्कम टॅक्सच्य पोर्टलवरुन तयार करा पॅन कार्ड, फक्त ३० मिनिटांत येईल ई-मेल

बँकेत FD करा

अनेक महिलांना पैसे सेव्हिंग करण्यासाठी भीती वाटते. त्यांना नेमके पैसे कसे आणि कुठे गुंतवावेत समजत नाही. अशा महिलांनी सुरुवातीला बँकेत जमा असलेले पैशांची एका ठराविक रक्कमेची ठराविक कालावधीसाठी FD करा. यात तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यांच्यात वाढही होईल. सर्वात महत्त्वाचे यात कोणताही धोका नाही.

SIP करा

तुम्ही SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्हाला परवडणाऱ्या योजने अंतर्गत एक ठराविक रक्कम गुंतवली जाते.

भिशी

पैसे साठवण्याचा आणि वाढवण्याचा सर्वात सिंपल मार्ग म्हणजे भिशी. भिशी अंतर्गत महिला त्यांचा एक ग्रुप करतात आणि दर महिन्याला ठराविक पैशांची त्यात गुंतवणूक करतात. प्रत्येक महिन्यात एका सदस्याला ते पैसे मिळता.

Ladki Bahin Yojana Money Saving Tips
Vima Sakhi Yojana: महिलांना महिन्याला मिळणार ७००० ते २१००० रुपये, नेमकी ही योजना आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com