Todays Gold Rate : सोन्याने पुन्हा भाव खाल्ला; दर १ लाखांच्या पार; वाचा १ तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Gold Rate Hike Today: आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दरात वाढ झाल्याने खरेदीदारांना प्रश्न पडला आहे.
Gold Rate
Gold Rate Todaysaam tv
Published On

सोन्याच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होत आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होत आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा ५० रुपयांनी वाढले आहेत.

Gold Rate
EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

सोने खरेदी करणे ही एक गुंतवणूक असतात. त्यात आता श्रावण महिना सुरु झाला आहे म्हणजेच सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. या काळात अनेकजण सोने खरेदी करतात. सोने खरेदी केल्यावर तुम्हाला नक्कीच चांगला परतावा मिळतो. परंतु सध्या सोन्याचे दर १ लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा १,०१,४०० रुपये आहेत. या दरात ५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८१,१२० रुपये आहेत. तर १० तोळे सोन्याचे दर १०,१४,००० रुपये आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22K Gold Rate)

आज १ तोळा सोन्याचे दर ९२,९५० रुपये झाले आहेत. या दरातदेखील ५० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७४,३६० रुपये आहेत तर १० तोळा सोने ९,२९,५०० रुपयांवर विकले जात आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ४० रुपयांनी वाढले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ७६,०५० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,८४० रुपये आहेत. या दरात ३२ रुपयांची वाढ झाली आहे. १० तोळा सोन्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली असून दर ७,६०,५०० रुपये झाले आहेत.

Gold Rate
Gold Price: सोन्याचा भाव घसरला! महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी खरेदीदारांना दिलासा; वाचा लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com