FASTag ची KYC अपडेट करण्याचा आज शेवटचा दिवस, यानंतर भरावा लागेल दुप्पट टोल टॅक्स, का? ते जाणून घ्या

FASTag KYC News: फास्टॅग केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. कारण आज म्हणजेच ३१ मार्चपर्यंत अपडेट केले नाही, तर टोलनाक्यावरील तुमचा त्रास वाढणार आहे.
FASTag KYC
FASTag KYC Saam Tv
Published On

FASTag KYC News:

देशातील टोलनाक्यांवरील लांबच लांब रांगांपासून लोकांची लवकरच सुटका होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नवीन टोल प्रणालीसाठी टोल प्लाझाची गरज भासणार नाही. याशिवाय फास्टॅगचे कामही संपणार आहे. नवीन यंत्रणा उपग्रहावर आधारित असेल. जे तुमच्या लोकेशननुसार थेट बँक खात्यातून पैसे कापणार. मात्र ही प्रणाली कधी सुरु होणार, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.

सध्या तुमच्यासाठी फास्टॅग केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे. कारण आज म्हणजेच ३१ मार्चपर्यंत अपडेट केले नाही, तर टोलनाक्यावरील तुमचा त्रास वाढणार आहे. याआधीही अनेकवेळा ही मुदत वाढवण्यात आली आहे, मात्र यंदा तसं करण्यात येणार नाही. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

FASTag KYC
EPFO KYC: घरबसल्या करता येणार EPFO ​​मध्ये E-KYC अपडेट, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) लोकांना कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी FASTag चे KYC अपडेट करणे अनिवार्य केले आहे. 31 मार्चपर्यंत अपडेट न केल्यास तुमचं FASTag करण्यात येईल. अशातच तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.  (Latest Marathi News)

याचे कारण म्हणजे जर FASTag काम करत नसेल तर नियमानुसार दुप्पट टोल आकारला जातो. म्हणजेच जेव्हा टोल 100 रुपये असेल तेव्हा तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतील. तसेच जिथे 200 रुपये आकारले जात आहेत, त्याच हिशोबाने तुम्हाला 400 रुपये किंवा इतर टोल भरावा लागेल.

FASTag KYC
Vivo X Fold 3 भारतात लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

FASTag अपडेट करण्याची स्टेप-बाय स्टेप प्रोसेस

फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे

1. वाहन नोंदणी प्रमाणपत्र

2. ओळखपत्र

3. पत्ता पुरावा

4. एक पासपोर्ट आकाराचा फोटो

5. ओळखपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड

ऑनलाइन अपडेट प्रोसेस

1. यासाठी तुम्हाला fastag.ihmcl.com वेबसाइटवर जावे लागेल.

2. वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाने लॉग इन करा.

3. लॉगिन केल्यानंतर, एक नवीन विंडो उघडेल. या विंडोमध्ये तुम्हाला My Profile या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4. यानंतर तुम्ही तुमचे फास्टॅग केवायसी स्टेटस पाहू शकता.

5. फास्टॅग केवायसी केले नसेल तर कागदपत्रांसह तपशील येथे पूर्णपणे भरावा लागेल.

6. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुमच्या फास्टॅग केवायसीची अपडेट प्रक्रिया पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com