Samsung India Launch News
SamsungSaam Tv

Tech News: Samsung चा पहिला AI-Powered टॅब भारतात लाँच; किंमत अन् फीचर्स जाणून घ्या

Samsung India Launch News: सध्या भारतात Samsung चा पहिला AI-Powered टॅब लाँच झालेला आहे. चला तर पाहूयात या टॅबबद्दल संपूर्ण माहिती.
Published on

सॅमसंग या भारतातील आघाडीच्‍या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलॅक्‍सी टॅब एस१०+ आणि टॅब एस१० अल्‍ट्रा लाँच केले. जगातील पहिले एआय-पॉवर्ड टॅब्‍लेट्स गॅलॅक्‍सी टॅब एस१०+ आणि एस१० अल्‍ट्रामध्‍ये उल्‍लेखनीय नाविन्‍यतांसह फ्लॅगशिप कार्यक्षमता, सुधारित क्रिएटिव्‍ह टूल्‍स आणि प्रगत गॅलॅक्‍सी एआय वैशिष्‍ट्ये आहेत, जी उत्‍पादकता आणि सर्जनशीलता वाढवण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. तुम्‍ही उत्‍पादकता वाढवण्‍याचे प्रयत्‍न करणारे व्‍यावसायिक असा किंवा काम सुलभ करणाऱ्या टूल्‍सचा शोध घेणारे क्रिएटर असा गॅलॅक्‍सी टॅब एस१० अल्‍ट्रा आणि एस१०+ अपेक्षांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत.

गॅलॅक्‍सी टॅब (Tab) एस१०+ आणि एस१० अल्‍ट्रामध्‍ये उल्‍लेखनीय व्हिज्‍युअल्‍स व सर्वोत्तम मनोरंजन अनुभवासाठी आकर्षक डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्‍प्‍लेसह अॅण्‍टी-रिफ्लेक्टिव्‍ह कोटिंग आहे. गॅलॅक्‍सी टॅब एस१० अल्‍ट्रा १४.६-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्‍प्‍लेसह वरचढ ठरतो, ज्‍यामध्‍ये आकर्षक व्हिज्‍युअल्‍स आणि सर्वोत्तम व्‍युइंग अनुभवासाठी अॅण्‍टी-रिफ्लेक्टिव्‍ह कोटिंग आहे, ज्‍यामुळे प्रखर प्रकाशात देखील स्क्रिनवरील कन्‍टेन्‍ट स्‍पष्‍ट दिसतो. या नवीन टॅब्‍लेट्समधील ड्युअल १२ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरे शिवाय ड्युअल रिअर कॅमेरे व्‍यावसायिक फोटोग्राफी (Photography)आणि व्हिडिओ कॉलससाठी परिपूर्ण टूल आहेत.

गॅलॅक्‍सी टॅब एस१० अल्‍ट्रा आणि टॅब एस१०+ एआय प्रोसेसिंगमधील प्रमुख सुधारणांचा फायदा घेत शक्तिशाली, विनासायास कार्यक्षमता देतात. पूर्वीचा डिवाईस गॅलॅक्‍सी टॅब एस९ अल्‍ट्राच्‍या तुलनेत गॅलॅक्‍सी टॅब एस१० अल्‍ट्रामधील सीपीयूमध्‍ये १८ टक्‍क्‍यांहून अधिक वाढ, जीपीयूमध्‍ये २८ टक्‍के वाढ आणि एनपीयूमध्‍ये १४ टक्‍के सुधारणा करण्‍यात आली आहे. विस्‍तारित बॅटरी लाइफ आणि सुपर-फास्‍ट चार्जिंगसह गॅलॅक्‍सी टॅब एस१० सिरीज कमी वेळेत चार्जिंगसह दीर्घकाळापर्यंत वापराची खात्री देते.

विशाल ११,२०० एमएएच बॅटरी, १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्‍टोरेजसह गॅलॅक्‍सी टॅब एस१० अल्‍ट्रा काम व गेमिंगसाठी अल्टिमेट सोबती आहे. या टॅब्‍लेटमध्‍ये त्‍याच्‍या पूर्वीच्‍या टॅब्‍लेटच्‍या तुलनेत अनेक चांगली वैशिष्‍ट्ये आहेत. गॅलॅक्‍सी टॅब एस१०+ मध्‍ये अधिक कॉम्‍पॅक्‍ट १२.३-इंच डायनॅमिक एएमओएलईडी २X डिस्‍प्‍ले, १२ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा आणि तेच प्रगत रिअर कॅमेरा सेटअप आहे. जवळपास १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्‍टोरेजसह हा टॅब्‍लेट पोर्टेबल फॉर्म फॅक्‍टरमध्‍ये सर्वोच्‍च कार्यक्षमतेची मागणी करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

गॅलॅक्‍सी टॅब एस१० सिरीज विनासायास व उत्‍पादनक्षम अनुभव देते, ज्‍यामुळे सर्जनशीलतेला वाढवण्‍यासाठी परिपूर्ण प्‍लॅटफॉर्म आहे. गॅलॅक्‍सी टॅब एस१० सिरीजमध्‍ये पीडीएफ ओव्‍हरले ट्रान्‍सलेशन देखील आहे, ज्‍यामुळे ऑन-स्क्रिन ओव्‍हरलेच्‍या माध्‍यमातून पीडीएफचे सहजपणे भाषांतर करता येते. हँडरायटिंग हेल्‍प गुंतागुंतीच्‍या नोट्सचे व्हिज्‍युअल्‍स सुलभ करते. तसेच, गॅलॅक्‍सी एआयचे स्‍केच टू इमेज वैशिष्‍ट्य गॅलॅक्‍सी टॅब एस१० अल्‍ट्राला संकल्‍पनांना वास्‍तविकतेत आणण्‍यासाठी अनुकूल टूल आहे, जे क्रिएटिव्‍ह असिस्‍टण्‍ट म्‍हणून काम करत अडथळ्यांवर मात करण्‍यास मदत करते.

गॅलॅक्‍सी टॅब एस१० सिरीज सॅमसंगच्‍या विस्‍तारित गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममध्‍ये विनासायास एकीकृत होण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे, जेथे वापरकर्ते कॉल घ्‍यायचा असो, मेसेजेसना उत्तर द्यायचे असो किंवा एका डिवाईसमधून दुसऱ्या डिवाईसमध्‍ये टास्‍क्‍स सुरू ठेवायचे असोत गॅलॅक्‍सी डिवाईसेसदरम्‍यान प्रभावीपणे स्विच करू शकतात.

Samsung India Launch News
Leo Polymer Technology: राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी 'लिओ पॉलिमर टेक्नोलॉजी'चा वापर होणार, काय आहे हे तंत्रज्ञान?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com