

मानवी मेंदू आणि कॉम्प्युटर कनेक्ट होणार
सॅम ऑल्टमन यांचे नवे संशोधन
भविष्यात मानवी मन वाचण्याचं तंत्रज्ञान येणार
मानवी मन गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे समोरच्याचं मन आपल्याला कळलं तर किती चांगलं होईल ना. सध्या हे शक्य नसलं तरी भविष्यात मात्र शक्य होऊ शकतं. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAI त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन आता मानवी मन वाचण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स नंतरची ही एका नवीन स्टार्टअपच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.
मर्ज लॅब्स नावाची स्टार्टअप कंपनी शस्त्रक्रियेशिवाय ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस तयार करण्यावर काम करत आहे. ध्वनी लहरी आणि चुंबकीय क्षेत्रांचा वापर करून मानवी विचार समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय मेंदू आणि संगणक यांच्यात थेट संबंध निर्माण करणे हे मर्ज लॅबचे उद्दीष्ट आहे. AI च्या मदतीनं मानवी विचार समजून घेतले जातील पण त्यात बदल करता येणार नाहीत.
या संशोधनातून ऑल्टमॅन हे इलॉन मस्क यांच्या Neuralink कंपनीला थेट स्पर्धा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मस्क यांची न्यूरालिंक कंपनी मेंदूत एक चिप बसविण्याचे काम करतंय. ज्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे. सॅम ऑल्टमन यांनी मात्र अशा शस्त्रक्रियेला विरोध केलाय. माणसाने काहीतरी विचार करावा आणि AI ने त्यास प्रतिसाद द्यावा, अशी त्यांची इच्छा आहे.
एकीकडे जेनेटीक इंजिनिअरींगद्वारे शरीरातील पेशी निरोगी ठेऊन वृद्धत्वाला रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे मानवी मन वाचण्याचा आटापीटा सुरु आहे. मनाचा ठाव घेण्य़ासाठी तंत्रज्ञानाची ही उत्तूंग झेप विधायक असावी आणि त्यातून मानवी जीवन समृद्ध व्हावं, हीच अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.