Tech News: कमाल आहे OnePlus Tab; दाम कमी पण काम भारी; जाणून घ्या OnePlus Pad Liteची किंमत अन् फिचर्स

OnePlus Pad Lite: विद्यार्थी आणि इतर युझर्सची गरज लक्षात घेत वनप्लसने आपला नवीन पॅड लाईट टॅबलेट लाँन्च केलाय. चला जाणून घेऊया यात काय खास आहे.
OnePlus Pad Lite
OnePlus Pad Lite Launched at ₹12,990 with 54-Day Standby Battery saam Tv
Published On
Summary
  • वनप्लसने Pad Lite टॅब भारतात ₹12,990 मध्ये लाँन्च केला आहे.

  • या टॅबमध्ये 54 दिवसांचा स्टँडबाय बॅटरी बॅकअप आहे.

  • विद्यार्थ्यांसाठी व डिजिटल शिक्षणासाठी आदर्श टॅब आहे.

  • मनोरंजनासाठी आवश्यक असलेले फीचर्स वाजवी किमतीत उपलब्ध आहेत.

जर तुम्ही परवडणारा असा बजेट फ्रेंडली टॅब शोधत असाल तर वनप्लसने तुमचा शोध संपवलाय. वनप्लस कंपनीने भारतात सर्वात परवडणारा टॅब "पॅड लाईट" लाँन्च केलाय. या नवीन टॅबची किंमत १२,९९० रुपये ठेवण्यात आलीय. या टॅबची किंमत कमी आहेच शिवाय यातील अनेक फीचर्स जे कमाल आहेत. नवीन पॅड लाइट विद्यार्थी आणि जे युझर्स फक्त मनोरंजनाठी टॅबचा वापर करतात त्यांच्यासाठी हा टॅब बनवण्यात आल्याचं कंपनीने सांगितलंय.

या नवीन टॅबमध्ये ९३४०mAh बॅटरी देण्यात आलीय.पूर्ण चार्ज केल्यावर तुम्ही ८० तासांपर्यंत गाणे ऐकून शकतात. तुम्ही सतत ११ तास व्हिडिओ पाहू शकता. खास गोष्ट म्हणजे पूर्ण चार्ज केल्यावर, याचा स्टँडबाय टाइम ५४ दिवसांचा असणार आहे. या टॅबचा ३३W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. यात मीडियाटेक हेलिओ जी१०० प्रोसेसर आहे.

हा टॅब ऑक्सिजनओएस १५.०.१ वर आधारित आहे आणि अँड्रॉइडवर काम करतो. वाचक मित्रांनो तुम्हाला माहितीये, नवीन वनप्लस पॅड लाइटची रचना प्रीमियम फील देणारी आहे. हा टॅबला ११ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. त्यात व्हिडिओ पाहणे, फोटो पाहणे आणि गेम खेळण्यास मजा येईल.

या डिस्प्लेमध्ये ५०० निट्स ब्राइटनेस आहे, जो डोळ्यांना आरामदायी देणारी. जर तुम्ही टॅब्लेटवर बराच वेळ काम करत असाल तरी याचा परफॉर्मन्स चांगला असतो. OnePlus Pad Lite दोन प्रकारांमध्ये लाँन्च करण्यात आलाय. यात ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज (वाय-फाय) आणि ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज (वाय-फाय + ४जी एलटीई) देण्यात आली आहेत.

ज्यांची किंमत अनुक्रमे १२,९९९ रुपये आणि १४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. यावर २००० रुपयांची इन्स्टंट ऑफर दिली जातेय. याशिवाय, या फोनवर ६ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील दिली जात आहे. नवीन वनप्लस पॅड लाइटची विक्री १ ऑगस्टपासून सुरू होईल. हा टॅबलेट ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

Q

वनप्लसचा नवीन टॅब कोणत्या नावाने लाँन्च करण्यात आला आहे?

A

वनप्लसने “Pad Lite” नावाचा नवीन बजेट टॅब भारतात लाँच केला आहे.

Q

OnePlus Pad Lite ची किंमत किती आहे?

A

या टॅबची किंमत ₹12,990 ठेवण्यात आली आहे.

Q

टॅबमध्ये कोणते खास फीचर आहे?

.

A

या टॅबमध्ये 54 दिवसांचा स्टँडबाय बॅटरी बॅकअप आहे, जे त्याला खास बनवते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com