BSNL 5G Service News: BSNL 5G नेटवर्क संदर्भात मोठी अपडेट; जिओ-एअरटेलच्या महागड्या प्लॅनची सुट्टी होणार? जाणून घ्या...

BSNL 5G Service News: सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती बीएसएनएल या कंपनीची. बीएसएनएल कंपनी लवकरच ग्राहकांसाठी नवीन नेटवर्कच्या संदर्भात नवीन पाऊल उचलणार आहे.
BSNL 5G Service News
BSNL 5G Service NewsSaam Tv
Published On

सरकारी दूरसंचार कंपनी संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल लवकरच ग्राहकांसाठी ''5G'' सेवा सुरु करणार आहे. सध्या बीएसएनएल आपले नेटवर्ग फाय जीच्या शर्यतीत आणण्यास तयार होत आहे. त्यासाठी त्यांनी आता 5G नेटवर्कची चाचणी सुद्धा सुरु केली आहे. ज्या स्पीडने बीएसएनएल 5G कडे जाण्याची वाटचाल करत आहे.ती संपूर्ण प्रक्रिया भारतीय दूरसंचार क्षेत्रासाठी मोठा गेम चेंजर ठरणार असल्याचे सांगितले जात आहे

चाचणी सुरु

बीएसएनएल (BSNL) या कंपनीने देशातील अनेक ठिकाणी अधिकृतपणे 5G (5G) नेटवर्कची चाचणी प्रोसेस सुरु केली आहे. यासाठी बीएसएनएल कंपनीने अनेक तत्रंज्ञान असलेल्या कंपन्यांशी भागीदारी केली आहे. या कंपन्यांमध्ये तब्बल सहा कंपन्यांचा समावेश असणार आहे. ज्या मदतीने बीएसएनएल ग्राहकांनी हाय-स्पीड डेटा सेवा (service) प्रदान करणार आहे.

BSNL 5G सह दूरसंचार क्षेत्र बदलेल

भारत देशात असलेल्या खाजगी टेलिकॉम कंपन्या असलेल्या एयरटेल आणि जिओ सतत त्यांच्या टॅरिफ योजनांमध्ये वाढ करताना आपल्याला दिसतात. अशा सर्व परिस्थितीत करोडो भारतीय वापरकर वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किंमतीत सेवा प्रदान करणाऱ्या टेलिकॉम ऑपरेटरची नितांत गरज आहे. बीएसएनएल अगदी सुरुवातीपासूनच स्वस्त आणि ग्राहकांना परवडणाऱ्या प्लॅनसाठी ओळखली जाते. जर अशा परिस्थिती बीएसएनएलने जर 5G आणि 4G सह मार्केटमध्ये प्रवेश केला तर, भारतातील दूरसंचार मार्केटमध्ये एअरटेल आणि जिओच्या असलेल्या वर्चस्वाला नक्की एक आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

स्थानिक कंपन्यांशी करार

बीएसएनएल कंपनी ग्राहकांना फक्त 5G नेटवर्कच देणार नाही तर भारताचे पर प्रांतिय असलेल्या कंपन्यांवरील अवलंबित्वही पूर्ण कमी करेल. बीएसएनएल ही कंपनी स्थानिक कंपन्यांच्या मदतीने 5G सेवा पुरवठा साखळीला चालना देत आहे. या सर्वांसाठी सरकारी टेलिकॉम कंपनी या वायरलेस आणि व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीसोबत काम करत असल्याची माहिती मिळत आहे. यासर्वांमुळे देशांतर्गत दूरसंचार उद्योग जर अतिशय मजबूत होतीलच मात्र स्थानिक पातळीवर नावीन्य आणि उत्पादनही अधिक प्रमाणात वाढेल.

BSNL 5G Service News
Tech News: तुमच्या मोबाईलचं चार्जर ओरिजनल की डुप्लीकेट? भारत सरकारचं अ‍ॅप दूर करेल तुमची समस्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com