आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Tatkal Passport Service Get Passport In 1 To 3 Days: तात्काळ पासपोर्ट सेवेमुळे पात्र अर्जदारांना कमी कालावधीत पासपोर्ट मिळू शकतो. 1 ते 3 दिवसांत पासपोर्ट मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, शुल्क आणि अर्ज प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती जाणून घ्या.
TATKAL PASSPORT SERVICE
TATKAL PASSPORT SERVICEsaam tv
Published On

अचानक एखाद्या महत्वाच्या कामासाठी परदेशात जाण्याची वेळ आली आणि तुमच्याकडे पासपोर्ट नसेल, तर घाबरण्याची गरज नाही. अशा परिस्थितीत तात्काळ पासपोर्ट सेवेमुळे कमी कालावधीत पासपोर्ट मिळवण्याची सुविधा उपलबद्ध आहे. या सेवेमुळे पात्र अर्जदारांना साधारणपणे 1 ते 3 दिवसांत पासपोर्ट मिळू शकतो. मात्र तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणे महत्वाचे आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी अर्ज नाकारला जाऊ नये, यासाठी आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवणे गरजेचे आहे.

TATKAL PASSPORT SERVICE
August 31 Deadline: 31 ऑगस्टपूर्वी ही 4 कामं करा, नाहीतर भरावा लागू शकतो दंड!

किती दिवसांत मिळतो पासपोर्ट?

तात्काळ पासपोर्ट सेवेद्वारे 1 ते 3 दिवसांत पासपोर्ट मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. अचानक परदेशात जाण्याची गरज निर्माण झाल्यास ही सेवा उपयोगी ठरू शकते. सामान्य पासपोर्टसाठी तुलनेने जास्त वेळ लागू शकतो आणि त्यासाठी शुल्क कमी असते. मात्र तात्काळ पासपोर्टसाठी शुल्कात सुमारे 2 हजार रुपयांपर्यंत फरक असू शकतो.

TATKAL PASSPORT SERVICE
Traffic challan: गाडीवर दंड आहे? 12 सप्टेंबरला मिळणार मोठी सूट; कमी पैशांत भरता येणार ई-चलान

कोणती कागदपत्रे आवश्यक?

तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज करताना योग्य कागदपत्रे सादर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्यास किंवा अर्जातील माहिती आणि कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास अर्जाच्या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेली ओळख, पत्ता आणि इतर संबंधित कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. तात्काळ पासपोर्टची प्रत्यक्ष प्रक्रिया, शुल्क, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रांची यादी अर्जाच्या प्रकारानुसार बदलू शकते. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत पासपोर्ट सेवा पोर्टलवरील अद्ययावत नियम तपासणे योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com