प्रत्येकाला प्रवास करताना प्रचंड भूक लागते. अनेकजण लांबच्या प्रवासासाठी ट्रेनचा पर्याय निवडतात. लांबचा प्रवास करायचा असेल तर लोक अनेक पदार्थ आपल्यासोबत घेऊन जातात. परंतु कधीकधी आपल्याला काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. परंतु अशावेळी ट्रेनमधून उतरुन तो पदार्थ आणणे शक्य होत नाही. परंतु आता तुम्हाला तुमच्या आवडीचा पदार्थ ट्रेनमध्ये सीटवर मिळणार आहे. यासाठी फूड डिलिव्हरी अॅप स्विगी आणि आयआरसीटीसीने पार्टनरशिप केली आहे.
ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेकदा सोबत घेतलेले खाद्यपदार्थ संपतात. त्यावेळी ट्रेनमध्ये दुसरे पदार्थ घेण्याचा काहीच ऑप्शन नसतो. प्रवाशांच्या सोयीसाठी आता स्विगी कंपनी आणि आयआरसीटीसीने पार्टनरशिप केली आहे. यामुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्येच फूड डिलिव्हरी मिळेल. याबाबत अधिक माहिती आयआरसीटीसीच्या पोर्टलवर मिळेल. (Latest News)
IRCTC ने याआधी बंडल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडसोबत पार्टनरशिप केली होती. यामध्ये IRCTC ई-कॅटरिंग पोर्टलच्या माध्यामातून प्री ऑर्डर केलेले जेवण तुम्हाला मिळेल.
ही सुविधा काही निवडक स्थानकांवर सुरु केली जाईल. यामध्ये बंगळुरु, भुवनेश्वर, विजयवाडा, विशाखापट्टणम या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यामुळे ट्रेनमधील प्रवाशांना आपल्या जागेवरच चांगले जेवण मिळेल.
याआधीही आयआरसीटीसीने Zomato या फूड डिलिव्हरी अॅपसोबत पार्टनरशिप केली होती. याअंतर्गतदेखील वेगवेगळ्या स्थानकांवर प्री ऑर्डर केलेले पदार्थ दिले जायचे.
IRCTC ई- कॅटरिंग पोर्टलद्वारे प्रवासादरम्यान सहज ऑर्डर करु शकता. यासाठी प्रवाशांना पोर्टलवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर पीआरएन नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करता येईल.