Success Story: IIT ड्रॉप आउट, अवघ्या ५ महिन्यात उभारली २८६ कोटींची कंपनी; मुंबईच्या राहुलची सक्सेस स्टोरी वाचा

Success Story Of Businessman Rahul Rai: अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं म्हणतात. असंच काहीसं राहुल राय यांच्यासोबतदेखील झाले आहे. त्यांनी अवघ्या ५ महिन्यात २८६ कोटींची कंपनी उभारली आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यशाचा मार्ग हा नेहमी अवघड असतो. कधीही तुम्ही शॉर्ट कट वापरुन यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे अनेकजण प्रयत्न करत नाही. अपयशाच्या भीतीने एक पाऊल पुढे टाकत नाही. परंतु कितीही अपयश आले तरीही आपण आपले प्रयत्न थांबवायचे नाहीत, असं म्हणतात. असंच अपयश राहुल राय यांनेदेखील आले होते. ते IIT ड्रॉप आउट होते. तरीही त्यांनी प्रयत्न थांबवले नाहीत. त्यांनी अवघ्या पाच महिन्यात २८६ कोटी रुपयांची कंपनी उभारली आहे.

Success Story
Success Story: लहानपणी गुरं चरायला घेऊन जायच्या, १२वी नंतर लग्नासाठी दबाव, तरीही UPSC देण्याचा निर्धार; IAS सी वनमथी यांचा प्रेरणादायी प्रवास

राहुल राय यांनी IIT मधून इंजिनियरिंग करण्याचा निर्णय घेतला. इंजिनियरिंगमध्ये त्यांचे मन लागत नव्हते. त्यामुळे त्यांनी दुसरं काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले आणि अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी २०१५ मध्ये अमेरिकेत बॅचलर ऑफ सायन्स इन इकोनॉमिक्स करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.राहुल राय यांनी २०१९ मध्ये मॉग्रन स्टेनलीमध्ये करिअरची सुरुवात केली. (Rahul Rai Successful Businessman)

राहुल राय या कंपनीत अॅनालिस्ट म्हणून काम करायचे. एका वर्षानंतर त्यांनी ही नोकरी सोडली अन् भारतात परतले. २०२० मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी नवीन काहीतरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा देशात क्रिप्टोकरन्सीचा ट्रेंड खूप वाढत होता. लोक डिजिटल संपत्ती आणि ब्लॉकचेन टेक्नोलॉजीमध्ये जास्त लक्ष देत होते. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात खूप रिसर्च केले.

२०२१ मध्ये राहुलने ईश अग्रवाल आणि सनत राव यांच्यासोबत गामा पॉइंट कॅपिटलची सुरुवात केली. ही एक क्रिप्टो हेड फंड आहे. जे डिजिटल संपत्तीत गुंतवणूक करतात. गामा पॉइंट या कंपनीने क्रिप्टो मार्केटमध्ये आपल्या स्वतः ची ओळख निर्माण केली होती. (Success Story Of Rahul Rai)

Success Story
Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

राहुल राय आणि त्यांच्या टीमच्या मेहनतीमुळे गामा पॉइंट कॅपिटल कंपनी क्रिप्टो क्षेत्रात हे खूप मोठी झाली. २०२१ मध्ये ब्लॉकटॉवर कॅपिटल कंपनीने या कंपनीला २८६ कोटी रुपयांचा खरेदी केले. राहुल रॉयने क्रिप्टो करन्सी क्षेत्रात स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. खूप कमी वयात त्यांनी खूप मोठी कामगिरी केली आहे. (Success Story News)

Success Story
Success Story: १०वी- १२वी नापास, तरीही पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS अंजु शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com