Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; सुभद्रा योजना नक्की आहे तरी काय?

Subhadra Yojana For Women: सरकारने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये देण्यात येणार आहेत. या योजनेत अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
Subhadra Yojana
Subhadra YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारनंतर विविध राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी योजना राबवल्या आहे. महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना राबवली तर मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ओडिशा सरकारनेदेखील महिलांसाठी सुभद्रा योजना राबवली आहे.

ओडिशा सरकारच्या सुभद्रा योजनेअंतर्गत महिलांना १०,००० रुपये मिळणार आहेत.ओडिशा सरकार हे पैसे दोन हप्त्यांमध्ये महिलांना देणार आहे. (Subhadra Yojana)

Subhadra Yojana
Post Office Scheme: ५००० रुपये गुंतवा अन् ८ लाख मिळवा; पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत होईल फायदाच फायदा

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? (Who Will Get Benefit Of Scheme)

ओडिशातील रहिवासी महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेत २१ ते ६० वयोगटातील महिलांना लाभ मिळणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिलांनादेखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. (Subhadra Yojana For Women)

योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How To Apply for Scheme)

या योजनेसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही https://subhadra.odisha.gov.in/index.html या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करताना तुम्हाला आधार नंबर, बँक खाते याबाबत माहिती भरायची आहे. ई-केवायसी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक हे कागदपत्रं अपलोड करायचे आहेत.

Subhadra Yojana
LIC Scheme: LIC ची भन्नाट योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् आयुष्यभर १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुभद्रा योजना राबवण्यात आली आहे. सुभद्रा योजनेत महिलांना आर्थिक मदत केली जाते. विविध राज्य सरकारनेदेखील अशाच अनेक योजना राबवल्या आहेत. नुकतीच दिल्ली सरकारनेदेखील महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १००० रुपये दिले जाणार आहेत.

Subhadra Yojana
Ladki Bahin Yojna: तुमच्याकडेही या ६ गोष्टी असतील, तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म रिजेक्ट होईल; आताच चेक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com