New Delhi: गेल्या महिन्यात शेअर बाजारात उसळी पाहायला मिळाली. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात भारतीयांनी सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या मालिकेमध्ये भरपूर सोने खरेदी केले आहे. १९ ते २३ जूनदरम्यान, सुवर्ण रोख्यांच्या मालिकेमध्ये लोकांनी 4,604 कोटी रुपये किमतीचे ७.७७ टन सोने खरदे केले. सरकारकडून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे सार्वभौम सुवर्ण रोखे जारी केले जातात. सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे प्रति ग्रॅम किंमत ५,९२६ रुपये इतकी आहे. (Latest Marathi News)
स्टॉक मार्केट बेंचमार्क इंडेक्स निफ्टीने जून महिन्यात १९,१८९.५ अकांवर ६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या आर्थिक वर्षात सोन्याने चांगला परतावा दिला होता. सरकारकडून भौतिक सोन्याला पर्याय म्हणून सादर केल्यावर २०१५ नंतर वर्षभरातनंतर ६४ मालिकेममध्ये १.७२ टन सोन्याची सरासरी सदस्यता पाहायला मिळाली.
गेल्या महिन्यात सुवर्ण रोख्याची किंमत ५,९२६ प्रति ग्रॅम होती. सार्वभौम सुवर्ण रोखेची सुरुवात केल्यानंतर इश्यू किंमत सर्वाधिक होती. भौतिक सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारी सुवर्ण रोखे योजना नोव्हेंबर २०१५ साली आणली होती. सरकार या गुंतवणुकीमागे सुरक्षेची हमी देखील देते.
सरकारने योजना का सुरु केली होती?
सीजीबी योजनेचा उद्देश आहे की, भौतिक सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारने सुवर्ण रोखे योजना समोर आणली आहे.
आपण किती गुंतवणूक करू शकतो?
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत एखादा व्यक्ती आर्थिक वर्षात जास्तीत जास्त ५०० ग्रॅम सोन्याचे रोखे खरेदी करू शकतो. त्याचबरोबर कोणत्याही आर्थिक वर्षात सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत जास्तीत जास्त ४ किलो सोन्याची खरेदी केली जाऊ शकते.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सार्वभौम सुवर्ण रोखेचे दोन हप्ते जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सुवर्ण रोख्यांची दुसरी मालिका ११ ते १५ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.