SIP Calculator: २० वर्षांसाठी १०,००० रुपयांची SIP करा, अन् महिन्याला ६५,००० मिळवा; सोप्या शब्दात कॅल्क्युलेशन समजून घ्या

SIP Return Calculator: एसआयपीमधील गुंतवणूक ही खूप फायद्याची ठरताना दिसत आहे. जर तुम्ही यामध्ये २० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर तुम्ही १ कोटींपर्यंतचा फंड जमा करु शकतात.
SIP Calculator
SIP CalculatorSaam Tv
Published On
Summary

भविष्यासाठी SIP मधील गुंतवणूक बेस्ट ऑप्शन

२० वर्षांसाठी दर महिन्याला १०,००० रुपयांची SIP करा

महिन्याला मिळणार ६५,००० रुपये

सध्याच्या काळात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे.तुम्हाला भविष्याचाही विचार करणे गरजेचे आहे. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी थोड्या फार प्रमाणात गुंतवणूक करायला हवी. यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे SIP (Systematic Investment Plan). एसआयपीमधील गुंतवूण तुम्हाला भविष्यात खूप फायदे मिळवून देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला SWP (systematic withdrawal plan) देखील मदत करणार आहे.

SIP Calculator
Government Scheme: निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा, तरुणांसाठी सुरु केली नवी योजना; वाचा सविस्तर

SWP तुम्हाला दरवर्षी तुमच्या गुंतवणूकीतील एक ठरावीक रक्कम काढण्याचा ऑप्शन देते. ही तुम्ही तुमचे पेन्शन म्हणून वापरु शकतात. तसेच एसआयपीमध्ये तुम्हाला दर महिन्याला पैसे गुंतवायचे असतात.याउलट एसडब्ल्यूपीमध्ये तुम्ही दर महिन्याला पैसे काढू शकतात. रिटायरमेंटनंतर जर तुम्हाला दर महिन्याला चांगली रक्कम हवी असेल तर हा उत्तम पर्याय आहे.याबाबत फायनान्शियल एक्सप्रेसने वृत्त दिले आहे.(SIP Return Calculator)

SIP Calculator
Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जुनी पेन्शन योजना कायमची बंद होणार?

SIP आणि SWP चे कॅल्क्युलेशन (SIP And SWP Investment)

जर तुम्ही आता ३० वर्षांचे आहात आणि २० वर्षांसाठी गुंतवणूक करायची आहे तर SIP आणि SWP मॉडेल तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये तुम्ही एसआयपीद्वारे दर महिन्याला पैसे गुंतवू शकतात आणि एसडब्ल्यूपीद्वारे दर महिन्याला पैसे काढूदेखील शकतात.यामुळे तुमचे मासिक उत्पन्न सुरु राहिल.

जर तुम्ही वयाच्या ३०व्या वर्षी १०,००० रुपयांची एसआयपी सुरु केली. ही एसआयपी तुम्ही २० वर्षांसाठी सुरु ठेवली तर तुम्हाला वयाच्या ५० व्या वर्षी १ कोटी रुपये मिळू शकतात.

जर तुम्ही SWP द्वारे पैसे काढण्याचा विचार करत असाल तर त्यापुढे २० वर्षांपर्यंत तुम्हाला ६५,००० रुपये महिन्याला मिळतील.त्यानंतरही तुमच्याकडे चांगला फंड जमा असेल.

अनेक म्युच्युअल फंडमध्ये १५ ते २० वर्षात मासिक परतावा दिला जातो. जर आपण १२ टक्के जरी परतावा गृहित ठरला तर त्याचे कॅल्क्युलेशन वाचा

२० वर्षांसाठी SIP चे कॅल्क्युलेशन (SIP Calculation for 20 Years)

मासिक एसआयपी-१० हजार रुपये

गुंतवणूक-२० वर्षांसाठी

रिटर्न-१२ टक्के

२० वर्षानंतर मिळालेले पैसे-१ कोटी रुपये

SIP Calculator
Government Scheme: निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा, तरुणांसाठी सुरु केली नवी योजना; वाचा सविस्तर

२० वर्षांसाठी SWP कॅल्क्युलेशन (SWP Investment for 20 Years)

जर तुम्ही हायब्रिड किंवा बॅलन्स फंडमध्ये १ कोटी रुपये गुंतवले त्यातून ८ टक्के परतावा मिळाला तर तुम्हाला महिन्याला ६५,००० रुपये मिळू शकतात.

गुंतवलेली रक्कम- १ कोटी रुपये

गुंतवणूकीचा कालावधी-२० वर्ष

परतावा- ८ टक्के

मासिक पैसे किती मिळणार-६५००० रुपये

२० वर्षातील व्याजदर- १.६३ रुपये

२० वर्षातल किती पैसे काढणार-१.५६ कोटी

२० वर्षानंतर शिल्लक रक्कम- १.०७ कोटी

SIP Calculator
SIP Investment: १० वर्षांत ₹५० लाख कमवण्याचे स्वप्न होईल साकार! दरमहा किती SIP करावी लागेल? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com