BSE च्या नावावर नवा विक्रम; एम-कॅपने ४००लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

Share Market : शेअर बाजाराने एक नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या कंपन्यांचे बाजार भांडवल (BSE M-Cap) ४०० लाख कोटींच्या पुढे गेले.
Share Market  BSE
Share Market BSE

Share Market News Today :

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने नवीन रिकॉर्ड बनवलाय. आज शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक हिरव्या निशाण्यावर व्यवहार करत होते बीएसई देखील वेगाने व्यवहार करत असून बीएसई कंपन्यांचे एम-कॅप ४०० लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. आज मिडकॅप आणि स्मॉल कॅपमध्येही वेगाने व्यवहार केला. (Latest News)

सोमवारी शेअर बाजाराने एक नवा विक्रम आपल्या नावावर केलाय. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या कंपन्यांचे बाजार भांडवल (BSE M-Cap) ४०० लाख कोटींच्या पुढे गेले आहे. आज व्यवहाराच्या सुरुवातीला निर्देशांकातही वाढ झाली. या निर्देशांकांच्या एमकॅपमध्येही वाढ मोठी झाली. बीएसई ३९७.४७ अंकांनी किंवा ०.५४ टक्क्यांनी वाढून ७४,६४५.६८ अंकांवर व्यवहार करत होता. बीएसईच्या समभागात १,९७९ शेअर्सच्या वाढीसह १,७०९ शेअर्स धोक्याच्या चिन्हात व्यवहार करत होता.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

BSE ने कधी-कधी केले रेकॉर्ड?

  • मार्च २०१४ मध्ये बीएसईच्या लिस्टिड कंपन्यांचा एम-कॅप पहिल्यांदा १०० लाख कोटी रुपयांच्या पार पोहोचला होता.

  • यानंतर फेब्रुवारी २०२१ पर्यंत BSE चे बाजार भांडवल २०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले होते.

  • जुलै २०२३ मध्ये बीएसईचे सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार मूल्य ३०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले.

  • आता ९ महिन्यांनंतर बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एम-कॅप ४०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

बीएसईच्या सुचीबद्ध कंपन्यांच्या एम कॅपमध्ये ५७ टक्के वाढ पाहण्यास मिळाली. निर्देशक, मजबूत कॉर्पोरेट कमाई आणि गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावनेमुळे शेअर बाजारात वाढ झालीय. याशिवाय देशी-विदेशी आवक वाढल्याने शेअर बाजारही वाढलाय. मागील वर्षी मिडकॅप निर्देशांकात ६० टक्के तेजी दिसली होती. त्याबरोबर स्मॉलकॅप निर्देशांक ६४ टक्क्यांनी वाढला आहे. सेन्सेक्समध्येही २८.६ टक्क्यांची वाढ झाली.

Share Market  BSE
Today's Gold Silver Rate : गुढीपाडव्यापूर्वीच सोनं ७० हजारांच्या पल्ल्याड, चांदीनंही भाव खाल्ला, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com