Samsung Tv: आता सॅमसंगचा टीव्ही नसणार स्मार्ट; 'या' Smart TV मध्ये नाही मिळणार गुगलचं फीचर

Samsung Smart : सॅमसंग आपल्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टेंटचं फीचर देणार नाहीये. त्यामुळे जर तुम्ही नवीन सॅमसंग टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एका रिपोर्टनुसार कंपनी १ मार्च २०२४ पासून सॅमसंगच्या कोणत्याच स्मार्ट टीव्हीवर गुगल असिस्टेंटचं फीचर देणार नसल्याचं म्हटलं होतं.
Samsung  Smart
Samsung SmartSamsung
Published On

जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सॅमसंग स्मार्ट टीव्ही चालवणाऱ्या वापरकर्त्यांना किंवा सॅमसंग स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांना मोठा धक्का बसू शकतो. सॅमसंग स्मार्ट टीव्ही वापरकर्ते किंवा सॅमसंग स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी ही बातमी मोठी आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सॅमसंग आपल्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये गुगल असिस्टेंटचं फीचर देणार नाहीये. (Latest News)

जर तुम्ही नवीन सॅमसंग टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. एका रिपोर्टनुसार कंपनी १ मार्च २०२४ पासून सॅमसंगच्या कोणत्याच स्मार्ट टीव्हीवर गुगल असिस्टेंटचं फीचर देणार नसल्याचं म्हटलं होतं. याआधीच्या टीव्हीमध्ये सॅमसंग कंपनी हे फीचर देत होते. नवीन टीव्हीमध्ये गुगलचं फीचर देण्यात येणार नसल्याचं याआधीच सांगण्यात आलं होतं.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मॉडेलमध्ये नसेल गुगलची सुविधा

  • Samsung 20022 Smart TV models

  • Samsung 20021 Smart TV models

  • Samsung 20020 8k and 4k QLED Smart TV models

  • Samsung 20020 Crystal UHD Smart TV models

  • Samsung 20020 Lifestyle Smart TV models

२०२० मध्ये पहिल्यांदाच सॅमसंगने आपल्या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंटचे फीचर दिले होते. टीव्हीच्या उत्पादनामध्ये हे फीचप देऊन फक्त ४ वर्षे झाली आता लगेच ते फीचर कंपनीने काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. गुगलच्या धोरणातील बदलामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने आपल्या सपोर्ट पेजमध्ये म्हटले आहे की, Google च्या धोरणातील बदलामुळे, Google Assistant १ मार्च २०२४ पासून Samsung TV वर उपलब्ध असणार नाही.

Samsung  Smart
Samsung Laptop: भारत सरकारपुढे झुकली ही कोरियन कंपनी; आता भारतातच बनवणार लॅपटॉप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com