Samsung Laptop: भारत सरकारपुढे झुकली ही कोरियन कंपनी; आता भारतातच बनवणार लॅपटॉप

Samsung Laptop News: ऍपलने भारतात आपली उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. आता आयफोन व्यतिरिक्त कंपन्या देखील भारतात आपल्या इतर उत्पादनांचे उत्पादन देखील सुरू करणार आहेत.
Samsung Laptop
Samsung LaptopSaam Digital
Published On

Samsung Laptop

ऍपलने भारतात आपली उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्याच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. आता आयफोन व्यतिरिक्त कंपन्या देखील भारतात आपल्या इतर उत्पादनांचे उत्पादन देखील सुरू करणार आहेत. याचा परिणाम इतर कंपन्यांवरही होत असून आता एक कोरियन कंपनीही भारतात आपल्या लॅपटॉपचे उत्पादन सुरू करणार आहे.

ॲपलची प्रतिस्पर्धी कोरियन कंपनी सॅमसंग आता आपले लॅपटॉप भारतात बनवणार आहे. कंपनी 2024 पासून आपल्या नोएडा प्लांटमध्ये लॅपटॉपचे उत्पादन सुरू करणार आहे. सॅमसगचे मोबाईल एक्सपिरियन्स बिझनेस हेड टीएम रोह यांनीही याला दुजोरा दिला आहे.

सॅमसंगसाठी भारत दुसरे मोठे उत्पादन केंद्र

सॅमसंगसाठी भारत हे दुसरे मोठे उत्पादन केंद्र आहे. त्यामुळे कंपनी आता भारतात लॅपटॉपचे उत्पादन सुरू करणार आहे. सध्या त्यासाठीची तयारी सुरू आहे. नोएडा सॅमसंगचं दुसरं सर्वात मोठं उत्पादन केंद्र आहे. प्लांटमध्ये काही किरकोळ बदल केले जात आहेत, जेणेकरून जागतिक मागणी पूर्ण करता येईल. यासाठी सॅमसंग याप्रकरणी भारत सरकारसोबत काम करत आहे. भारतासोबतचे सहकार्याचे संबंध कंपनीसाठी खूप फायदेशीर आहेत आणि भविष्यातही एकत्र काम करत राहू, असं कंपनीने म्हटलं आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Samsung Laptop
Tata Curvv: टाटा मोटर्सची अजून एक दमदार कार; जबरदस्त लूक आणि फीचरसह होणार लाँच

अटी मान्य करण्यास पाडलं भाग

सॅमसंगने भारतात लॅपटॉप बनवण्याचा घेतलेला निर्णय काही अचानक नाही. सॅमसंगला भारत सरकारच्या स्थानिक उत्पादनाच्या अटी मान्य करण्यास भाग पाडले आहे. गेल्या वर्षी सरकारने देशात परदेशी लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यानंतर बंदी मागे घेण्यात आली असली तरी त्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढली.

अलीकडेच सरकारने लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात शुल्क कमी केले आहे. तो 15 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आला आहे. तर अर्थसंकल्पातही सरकारने पीएलआय योजनेसाठी तरतूद वाढवली आहे. स्थानिक उत्पादन वाढवून सॅमसंगलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Samsung Laptop
Budget 2024: सरकारच्या एका निर्णयामुळे स्मार्टफोन होणार स्वस्त; काय असतील नवीन किंमती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com