RRB Group D Recruitment: रेल्वेतील सर्वात मोठी भरती! २२००० रिक्त जागा; अर्ज करण्याची तारीख पुढे ढकलली; वाचा

RRB Group D Recruitment 2026: रेल्वेतील या वर्षातील सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेत तब्बल २२००० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज कधीपासून करता येणार ते जाणून घ्या.
Railway Recruitment
Railway RecruitmentSaam Tv
Published On
Summary

रेल्वेतील सर्वात मोठी भरती

ग्रुप डी पदांसाठी २२००० जागांवर होणार भरती

अर्जाची तारीख पुढे ढकलली

रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आता या भरतीसाठीची अर्जप्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी २२००० जागांवर भरती केली जाणार होती. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया २१ जानेवारी २०२६ रोजी सुरु होणार आहे. मात्र, आता ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

Railway Recruitment
ZP School Jobs: तयारीला लागा! जिल्हा परिषद शाळेत ८००० शिक्षकांची भरती; निवडणुका संपताच नोटिफिकेशन निघणार

आरआरबी म्हणजेच रेल्वे भरती बोर्डाने अधिकृत वेबसाइटवरुन याबाबत माहिती दिली आहे. याचसोबत ऑनलाइन अर्जप्रक्रियेचं नवीन वेळापत्रकाचीदेखील घोषणा केली आहे.

आरआरबीने २७ डिसेंबर रोजी ग्रुप डी भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. यामध्ये २२००० पदे भरती केली जाणार आहे. आता या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी नवीन तारीख घोषित करण्यात आली आहे.

रेल्वे भरती बोर्डाने ग्रुप डी पदांसाठी अर्जप्रक्रिया ही ३१ जानेवारी २०२६ पासून सुरु होणार असणार असल्याचे सांगितले आहे. यानुसार ही अर्जप्रक्रिया २ मार्च २०२६ पर्यंत सुरु असणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

रेल्वे भरती बोर्डाच्या ग्रुप डी पदासाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. तुम्हाला अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करायची आहेत. यानंतर सही करुन अर्ज सबमिट करायचा आहे. याबाबत लवकरच अपडेट समोर येईल.

ग्रुप डी पदांमध्ये १२५०० पदे इंजिनियरिंग विभागात असणार आहे. ट्रॅक मेंटेनर ग्रेड ४ पदांसाठी ११,००० जागा रिक्त आहेत. ट्राफिक पॉइंट बी पदासाठी ५००० जागा रिक्त आहेत. असिस्टंट (S&T)पदासाठी १५०० तर असिस्टेंट (C&W) साठी १००० जागा रिक्त आहेत. असिस्टंट ऑपरेशन पदासाठी ५०० जागा तर असिस्टंट लोको शीट पदासाठी २०० जागा रिक्त आहेत. विविध विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

Railway Recruitment
Government Job: सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; मिळणार लाखो रुपये पगार; पात्रता काय? वाचा सविस्तर

आरआरबी ग्रुप डी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ITI केलेले असावे. १८ ते ३३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

आरआरबी ग्रुप डी पदांसाठी सीबीटी टेस्टद्वारे भरती केली जाणार आहे. यानंतर फिजिकल टेस्ट घेतली जाणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना १८,००० रुपये बेसिक सॅलरी मिळणार आहे.

Railway Recruitment
Bank Jobs: खुशखबर! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com