Redmi Note 14: किंमत स्वस्त अन् कॅमेरा मस्त; जाणून घ्या Redmi Note 14 SE स्मार्टफोनचे धमाल फीचर्स

Xiaomi launches Redmi Note 14 SE in India : Redmi Note 14 SE दमदार फीचर्ससह भारतात लॉन्च झालाय. रेडमी नोट १४ सीरीजचा हा सर्वात स्वस्त मॉडेल आहे.
Redmi Note 14
Xiaomi launches Redmi Note 14 SE in Indiasaam tv
Published On
Summary
  • Redmi Note 14 SE दमदार फीचर्ससह भारतात लॉन्च झालाय. रेडमी नोट १४ सीरीजचा हा सर्वात स्वस्त मॉडेल आहे.

  • रेडमी नोट 14 SE भारतात लाँच, ही नोट 14 सिरीजमधील सर्वात स्वस्त मॉडेल

  • 5110mAh बॅटरी आणि 50MP मुख्य कॅमेरासह दमदार परफॉर्मन्स

  • ट्रिपल कॅमेरा सेटअप, एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

  • बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये मोठा पर्याय म्हणून लॉन्च

Redmi Note 14 सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन लाँच झाला आहे. हा नवीन रेडमी स्मार्टफोन शक्तिशाली ५११०mAh बॅटरी, ५०MP कॅमेरा यासारख्या दमदार फीचर्ससह लॉन्च करण्यात आलाय. याआधी, कंपनीने या सिरीजमधील स्टॅण्डर्ड रेडमी नोट १४ व्यतिरिक्त नोट १४ प्रो आणि नोट १४ प्लस लाँन्च केले आहेत. हे नवीन मॉडेल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह देण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे कंपनीने हा फोन फक्त एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँन्च केलाय. (Redmi Note 14 SE launched in India with 50MP camera know price and specifications)

Redmi Note 14 SE ची किंमत

Redmi Note 14 SE फक्त 6GB RAM आणि 128GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आलाय. या फोनची किंमत १४,९९९ रुपये आहे. कंपनीने फोन खरेदीवर १,००० रुपयांची इन्स्टंट बँक डिस्काउंट दिलाय. हा रेडमी फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो - क्रिमसन रेड, मिस्टिक व्हाइट आणि टायटन ब्लॅक. ग्राहक मित्रांनो ७ ऑगस्टपासून Mi.com व्यतिरिक्त हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट Amazon, Flipkart सह सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेलवरून खरेदी करता येणार आहे.

रेडमीचा हा परवडणारा फोन ६.६७-इंचाचा AMOLED डिस्प्लेसह येतो. या फोनमध्ये पंच-होल डिझाइन डिस्प्ले असेल, जो १२०Hz उच्च रिफ्रेश रेट आणि २१०० निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनच्या डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ चे कोटिंग देण्यात आलीय.

Redmi Note 14
EPFO चा मोठा निर्णय; पीएफ खात्यात एकही पैसा नसला तरी EDLI मधून मिळतील ५०,०००रुपये

या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. रेडमी नोट १४प्रमाणे, या फोनमध्ये देखील मीडियाटेक डायमेन्सिटी ७०२५ अल्ट्रा प्रोसेसर आहे. हा फोन ६GB LPDDR4X रॅम आणि १२८ GB UFS २.२ सह येतो. या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी वाढवता येते. हा फोन अँड्रॉइड १५ वर आधारित हायपरओएस २ वर काम करतो.

Redmi Note 14
Traffic Rule: भावा,वारंवार चालान येणं चांगलं नव्हं! ड्रायव्हिंग लायसन्स होईल रद्द; जाणून घ्या नवीन नियम

रेडमीच्या या स्वस्त फोनमध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. या फोनमध्ये ५० MP प्रायमरी, ८ MP सेकेंडरी आणि २ एमपी मॅक्रो कॅमेरा देण्यात आलाय. याशिवाय, या रेडमी फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २० MPचा कॅमेरा देण्यात आलाय. यात ५११०mAh बॅटरीसह ४५W फास्ट चार्जिंग फीचर असेल. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ३.५mm ऑडिओ जॅक, हायब्रिड ड्युअल सिम देण्यात आले आहे.

Q

रेडमी नोट 14 SE हा फोन भारतात कधी लाँच झाला?

A

रेडमी नोट 14 SE हा स्मार्टफोन नुकताच भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आलाय.

Q

या फोनमध्ये कोणते प्रमुख फीचर्स आहेत?

A

या फोनमध्ये 5110mAh बॅटरी, 50MP मुख्य कॅमेरा, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि दमदार प्रोसेसर देण्यात आलाय.

Q

रेडमी नोट 14 SE किती स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे?

A

हा स्मार्टफोन सध्या फक्त एकाच स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आलाय.

Q

हा फोन रेडमी नोट 14 सिरीजमध्ये कुठल्या प्रकारचा आहे?

A

हा फोन रेडमी नोट 14 सिरीजमधील सर्वात स्वस्त आणि बजेट-फ्रेंडली मॉडेल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com