

Summary -
आरबीआयने रेपो रेटमध्ये २५ बेसिक पॉईंटने कपात केली
रेपो रेट कमी झाल्यामुळे ग्राहक ईएमआय कधी कमी होणार याची वाट पाहत आहेत
अनेक बँकाकडून रेपो दरात कपात झाली असताना देखील ग्राहकांना फायदा दिला जात नाही
आरबीआयच्या गव्हर्नर यांनी बँकांची बैठक घेत त्यांना महत्वाचे आदेश दिले
कर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच ईएमआय कमी होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच रेपो रेटमध्ये २५ बेसिक पॉईंट्सने कपात केली. आरबीआयने रेपो रेट कमी केल्यानंतर ईएमआय कमी होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. त्यांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण लवकरच ईएमआय कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सर्व बँकांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. त्यांनी बँकांना रेपो रेटमधील कपातीचा संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचे निर्देश बँकांना दिले आहेत.
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी मंगळवारी बँकांना सूचना दिल्या की, 'रेपो रेट कपातीचा पूर्ण फायदा ग्राहकांना तात्काळ द्या.' रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असताना देखील अनेक बँका कर्ज घेतलेल्या त्यांच्या ग्राहकांना याचा फायदा देत नाहीत असे दिसून आले. यावर रिझर्व्ह बँकेने नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर यांनी बँकांची बैठक बोलावली.
फेब्रुवारी २०२५ पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात १.२५ टक्के म्हणजे १२५ बेसिस पॉइंट्स कपात केली आहे. बँकेने रेपो दर ५.२५ टक्क्यापर्यंत कमी केला आहे. देशाचा जीडीपी वाढ दरही ८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. रेपो रेट कमी झाला असून देखील बहुतेक बँका अजूनही ग्राहकांना जुने, उच्च व्याजदर आकारत आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आरबीआयच्या गव्हर्नर यांनी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका आणि मोठ्या खासगी बँकांच्या एमडी आणि सीईओंना बोलावून बैठक घेतली. 'हे पैसे जनतेचे आहेत. उशीर करू नका, ईएमआय कमी करा.', असे निर्देश त्यांनी बँकांना दिले.
आरबीआयने बँकांना स्पष्टपणे सांगितले की, ही बैठक नियमितपणे घेतली जाते. याआधी बैठक २७ जानेवारी २०२५ रोजी झाली होती. याचा अर्थ बँकांवर सतत नजर ठेवली जाईल. जर व्याजदर लवकरच कमी झाले नाहीत तर अधिक कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात. याचा चेंडू आता बँकांच्या कोर्टात आहे. जानेवारीपर्यंत गृहकर्ज, कार आणि वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कपात होणे अपेक्षित आहे. अन्यथा आरबीआय आणखी कठोर उपाययोजना करू शकते.'
तसंच, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे बँकिंग स्वस्त झाले पाहिजे. असे केल्यामुळे छोटे व्यवसाय आणि सामान्य नागरिकांना फायदा होईल, असे संजय मल्होत्रा यांनी बँकांना सांगितले. त्याचसोबत, 'ग्राहक सेवा सुधारण्यास यावी, ग्राहकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करा, डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांबबत सतर्क राहा आणि गुप्तचर आधारित सुरक्षा वाढवा.', असे आदेश आरबीआय गव्हर्नर यांनी बँकांना दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.