Government Scheme : वर्षाला २० रुपये भरा आणि २ लाखांचा फायदा मिळवा, सरकारची जबरदस्त योजना

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana : देशातील गरीबातील गरीब व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळावा या हेतीन या योजनेचा प्रीमियम इतका कमी ठेवण्यात आला आहे.
Government Savings Scheme
Government Savings SchemeSaam Tv

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana :

सरकारकडून नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. काही योजना तर आपल्याला माहितही नसतात. मात्र अनेक अशा योजना आहेत ज्या आपल्यासाठी खूप उपयुक्त असतात, ज्या माहित असणे गरजेचं आहे. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY). या योजनेअंतर्गत अपघाताच्या वेळी मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास यातून विम्याच्या रकमेसाठी क्लेम केला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. यासाठी केवळ 20 वार्षिक प्रीमियम तु्म्हाला भरावा लागेल. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

PMSBY ची सुरुवात सरकारने 2015 मध्ये केली होती. देशातील गरीबातील गरीब व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळावा या हेतीन या योजनेचा प्रीमियम इतका कमी ठेवण्यात आला आहे. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, विम्याची रक्कम त्याच्या नॉमिनीला दिली जाते.

Government Savings Scheme
Investment Scheme : मुलीच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चाची चिंता मिटेल, फक्त या सहापैकी एक गोष्ट करा!

पात्रता काय?

अर्जदार भारतीय असणे आवश्यक आहे. त्याचे वय 18 ते 70 वर्षे असावे. अर्जदाराचे बँकेत बचत खाते (Saving Account) असावे आणि खात्यात ऑटो डेबिट सुविधा असावी. (Utility News)

विमाधारक व्यक्तीचे अपघातात डोळे निकामी होणे, हात आणि पाय गमावणे किंवा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. एक हात किंवा पाय निकामी झाल्यास किंवा एका डोळ्यातील दृष्टी कमी झाल्यास 1 लाख रुपयांपर्यंतचा लाभ दिला जातो. 20 रुपयांचा वार्षिक प्रीमियम फक्त 1 वर्षासाठी वॅलिड आहे. यानंतर योजना रिन्यू करावी लागेल. (Latest Marathi News)

योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज केला जाऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, अधिकृत वेबसाइट https://www.jansuraksha.gov.in/ वर जावे लागेल . येथे फॉर्मवर क्लिक केल्यानंतर, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या पर्यायावर क्लिक करावा. यानंतर तुम्ही अर्जाच्या पर्यायावर क्लिक करा. तुमची भाषा निवडा आणि नंतर फॉर्ममध्ये आवश्यक माहिती योग्यरित्या भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा आणि नंतर फॉर्म सबमिट करा. ऑफलाईन अर्जासाठी तुम्ही बँकेच्या शाखेशी संपर्क साधा, जेथे तुमचे आधीच बचत खाते आहे.

Government Savings Scheme
Investment Tips: 'या' सरकारी योजनेत मिळत आहे FD पेक्षा जास्त परतावा, गुंतवणुकीवर मिळणार सर्वाधिक व्याज

कोणती कागदपत्रे आवश्यक?

- आधार कार्ड

- मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा इतर कोणतेही ओळखपत्र

- इनकम सर्टिफिकेट

- बँक अकाऊंट डिटेल्स

- वयाचा पुरावा

- पासपोर्ट साईज फोटो

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com