

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये रिकरिगं डिपॉझिट (RD) योजना ही सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेत दररोज थोडी बचत करून भविष्यासाठी मोठा निधी तयार करता येतो. विशेष म्हणजे या योजनेला केंद्र सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते.
या योजनेमध्ये खातं उघडण्यासाठी फक्त १०० रुपयांपासून सुरुवात करता येते. तसेच गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नसते. सध्या या योजनेवर ६.७ टक्के वार्षिक व्याजदर दिला जातोय. खातं तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये Single किंवा Joint नावाने उघडू शकता.
जर तुम्ही रोज ३०० रुपये म्हणजेच दरमहिन्याला ९००० रुपये या योजनेत जमा केले, तर पाच वर्षात तुमची एकूण गुंतवणूक ५.४० लाख होईल. ६.७ टक्के व्याजानुसार मॅच्युरिटीच्यावेळी तुम्हाला ६,४२,२९१ मिळतील. यामध्ये जवळपास १,०२,२९१ हे फक्त व्याजाचं उत्पन्न असेल.
यानंतर हीच RD योजना आणखी ५ वर्षांसाठी वाढवली, तर १० वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक १०.८० लाख रुपये होईल. त्यावर मिळणाऱ्या व्याजावर तुमचा एकूण निधी १५,३७,६९२ पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे रोज आणि शिस्तबद्ध बचत करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते. पण या योजनेतला एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर एखाद्या महिन्यात हप्ता वेळेवर भरला नाही, तर प्रति महिना १ टक्के दंड भरावा लागतो. तसेच सलग चार हप्ते भरले नाही तर RD खातं आपोआप बंद होऊ शकतं.
सरकारी हमी, सुरक्षित गुंतवणूक, नियमित बचतीची सवय आणि आकर्षक परतावा यामुळे पोस्ट ऑफिसची RD योजना दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी एक चांगला पर्याय मानली जाते. पण गुंतवणूक करण्याआधी सध्याचा व्याजदर आणि नियम पोस्ट ऑफिसमध्ये एकदा तपासून घेणं योग्य ठरेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.