Smartphone Launch: नवा POCO M7 Plus भारतात लाँच, ७०००mAh बॅटरीसह मिळेल ५०MP कॅमेरा, किंमत किती?

5G Smartphone: Poco ने भारतात नवीन बजेट फोन POCO M7 Plus 5G लाँच केला आहे. 7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा आणि दोन कॉन्फिगरेशनसह उपलब्ध, किंमत आणि तपशील जाणून घ्या.
POCO M7 Plus 5G भारतात नवीन लाँच, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा
POCO M7 Plus 5G भारतात नवीन लाँच, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा
Published On
Summary
  • POCO M7 Plus भारतात लाँच, 7000mAh बॅटरीसह

  • 50MP रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा

  • 6.9-इंच FHD+ 144Hz डिस्प्ले, HyperOS Android 15

  • किंमत 13,999 रुपये पासून सुरू, फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध

POCO ने भारतीय बाजारात त्यांचा नवीन स्मार्टफोन POCO M7 Plus 5G लाँच केला आहे, जो M6 Plus चा उत्तराधिकारी आहे. या नवीन फोनमध्ये 6.9-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले दिला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो आणि सेंटर पंच होल कटआउटसह येतो. कंपनीच्या मते, हा या सेगमेंटमधील सर्वात मोठा डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. स्क्रीनची पीक ब्राइटनेस 550 निट्स आहे आणि संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिले आहे.

हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6s Gen 3 प्रोसेसरवर कार्य करतो आणि यामध्ये 6GB किंवा 8GB पर्यंत रॅमचा पर्याय उपलब्ध आहे. स्टोरेजसाठी 128GB अंतर्गत मेमरी असून, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. फोन अँड्रॉइड 15 वर आधारित हायपरओएसवर काम करतो आणि ड्युअल सिम सपोर्टसह येतो.

POCO M7 Plus 5G भारतात नवीन लाँच, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा
Realme Smartphoes: Realme आणत आहे दोन दमदार फोन, नवीन ड्युअल चिपसेट 'या' दिवशी होणार भारतात लाँच

फोटोग्राफीसाठी POCO M7 Plus 5G मध्ये 50 मेगापिक्सेल मेन लेन्ससह ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. सुरक्षा सुविधेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. पॉवरसाठी 7000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

POCO M7 Plus 5G भारतात नवीन लाँच, 7000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा
Oppo K13 Turbo आणि Oppo K13 Turbo Pro लाँच, वाचा जबरदस्त स्पेसिफिकेशन्स आणि खास ऑफर्स

POCO M7 Plus 5G स्मार्टफोन आता भारतात तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. क्रोम सिल्व्हर, अ‍ॅक्वा ब्लू आणि कार्बन ब्लॅक असे तीन रंग आहे. हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच झाला आहे, 6GB RAM + 128GB स्टोरेजसाठी किंमत 13,999 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेजसाठी 14,999 रुपये. 19 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर खरेदी करता येईल. लाँच ऑफरमध्ये HDFC, ICICI आणि SBI कार्डवर 1000 रुपयांची सूट, 1000 रुपयांचा एक्सचेंज लाभ आणि नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांसाठी हा बजेट फोन अधिक आकर्षक बनतो.

Q

POCO M7 Plus भारतात कधी लाँच झाला?

A

POCO M7 Plus भारतात 2025 मध्ये लाँच झाला आहे आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Q

POCO M7 Plus ची बॅटरी क्षमता किती आहे?

A

या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी दीर्घकालीन वापरासाठी योग्य आहे.

Q

कॅमेरा कसा आहे?

A

POCO M7 Plus मध्ये 50MP रिअर कॅमेरा आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

Q

या फोनची किंमत किती आहे?

A

6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी किंमत 13,999 रुपये आणि 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 14,999 रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com