PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचे पैसे आले नाहीत? ही प्रोसेस करा; पैसे लगेच होतील जमा

PM Kisan Sanman Nidhi Yojana Installment: पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १८वा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झाला आहे. या योजनेत तुमच्या अकाउंटला पैसे आले नसतील तर ही प्रोसेस करा.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaGoogle
Published On

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये मिळतात. या योजनेचा १८वा हप्ता कोट्यवधी शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी या योजनेचा हप्ता जमा करण्यात आला आहे. या योजनेत जर तुमच्या अकाउंटवर पैसे आले नसतील तर काळजी करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही हेल्पलाइन नंबरवर फोन करुन मदत मिळवू शकतात.

पीएम किसान सन्मान निधीचे पैसे न येण्याची कारणे

पीएम किसान सन्मान निधी योजनेत जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नसेल तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याचसोबत तुम्ही बँक अकाउंटचे केवायसी केले नसेल तर पैसे मिळणार आहे. जर तु्म्ही आता बँक अकाउंटचे केवायसी केले तर तुमच्या अकाउंटला पुढचा जमा केला जाईल.तसेच तुम्हाला १८वा हप्ता आला नसेल तर त्याबाबत सर्व माहिती तुम्हाला मिळू शकते.

PM Kisan Yojana
PPF Scheme: कामाची बातमी! दररोज फक्त २०४ रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत सर्व माहिती तुम्हाला टोल फ्री हेल्पलाइन नंबर ०११-२३३८१०९२ या नंबरवर देण्यात आली आहे.त्याचसोबत तुम्हाला pm kisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क करु शकतात. यानंतर पीएम सन्मान निधी योजनेबाबत सर्व माहिती मिळेल.

पीएम किसान योजनेत eKYC करण्याची प्रोसेस

सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर farmers corner या सेक्शनवर जाऊन eKYC ऑप्शन सिलेक्ट करावे लागेल.

यानंतर तुम्हाला eKYC पेजवर जाऊन १२ अंकी आधार नंबर टाकावा लागेल. त्यानंतर सर्च ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल.त्यानंतर ओटीपी टाका.

यानंतर तुम्ही सबमिट बटणवर क्लिक करा. यानंतर तुमचे eKYC पूर्ण होईल. (PM Kisan Sanman Nidhi Yojana)

PM Kisan Yojana
PM Kisan Samman Nidhi : नवरात्रीनिमित्त PM मोदींकडून शेतकऱ्यांसाठी मोठं गिफ्ट; किसान सम्मान निधीचा १८ वा हप्ता खात्यात जमा

स्टेट्‍स कसा चेक करायचा (PM Kisan Sanman Nidhi Yojana Status)

सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

होमपेजवर know your status या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. त्यानंतर ओटी टाकावा लागेल.

ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या स्क्रिनवर लगेचच योजनेचा स्टेट्‍स दिसेल.

PM Kisan Yojana
Lakhpati Didi Scheme : खुशखबर! लाडक्या बहिणींसाठी सरकार देतंय ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com