Narayana Murthy: चीनचा ९-९-६ फॉर्म्युला वापरा, आठवड्यात किती तास काम करावे?नारायण मूर्तींनी पुन्हा दिला सल्ला

Narayana Murthy on 72 Work Hours: इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यांनी कामाच्या वेळेबाबत ९-९-६ चा फॉर्म्युला वापरण्याचा सल्ला दिला आहे. हा फॉर्म्युला नक्की आहे तरी काय? वाचा सविस्तर.
Narayana Murthy
Narayana MurthySaam Tv
Published On
Summary

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती पुन्हा चर्चेत

आठवड्याला ७२ तास काम करण्याचा दिला सल्ला

चीनमधील ९-९-६ फॉर्म्युला वापरायला हवा

इन्फोसिस हा कंपनी जगातील टॉप आयटी कंपनींपैकी एक आहे. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती हे नेहमीच चर्चेत असतात. नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा कामाच्या वेळेबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहे.

Narayana Murthy
Duty Hours Increase: कामगारांसाठी महत्वाची बातमी! कामाचे तास वाढले, यापुढे ९ ऐवजी १२ तासांची ड्युटी

नारायण मूर्ती यांनी याआधी आठवड्याला ७० तास काम करावे, असं सुचवलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आठवड्याभरात ७२ तास काम करण्याच्या संकल्पनेला समर्थन दिले आहे.यासाठी त्यांनी चीनच्या कामाच्या धोरणाबद्दल उदाहरण दिले आहे.

नारायण मूर्ती काय म्हणाले? (Narayan Murthy)

मिडिया रिपोर्टनुसार, नारायण मूर्ती यांनी एका मुलाखतीत याबाबत वक्तव्य केलं होते. त्यांनी चीनच्या 9-9-6 कामाबद्दल उदाहरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, चीनमध्ये कामाबद्दल एक फॉर्म्युला आहे ९-९-६. याबद्दत तुम्हाला माहितीये का? ९-९-६ म्हणजे आठवड्याचे ६ दिवस रोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत काम, भारतातील तरुणांनीदेखील अशाच प्रकारे कामाचे टाईमटेबल स्विकारायला हवे. आधी आयुष्य घडवा, नंतर काम आणि आयुष्य यातील बॅलन्सची काळजी करा, असं त्यांनी सांगितले.

नारायण मूर्तींच्या या विधानावर सोशल मीडियावर खूप टीका होत आहे. तसेच अनेकांनी युरोपमधील कामाच्या मॉडेलबाबतही माहिती दिली आहे.

Narayana Murthy
US Work Permit Rules : अमेरिकेच्या निर्णयाचा होणार परिणाम, भारतीयांच्या नोकरीवर टांगती तलवार? | VIDEO

आरोग्यावर परिणाम

यावर सोशल मीडियावर खूप टीका होत आहे. यामुळे शरीरावर परिणाम होत असल्याचे अनेकांनी सांगितले. अतिरिक्त काम केल्यामुळे त्यांचे आरोग्य, मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. याआधीही नारायण मूर्ती यांनी कामाचे तास वाढवण्याचा सल्ला दिला होता. यामुळेदेखील त्यांच्यावर टीका झाली होती.

Narayana Murthy
Sudha Murthy : सुधा मूर्ती यांच्या 'त्या' कृतीनं वेधलं लक्ष; नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com