Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडचा मास्टर प्लॅन; फक्त १०० रुपये गुंतवा अन् करोडपती व्हा

Investment Tips: अनेक जण एसआयपी आणि म्युच्युअल फंडचीही निवड करतात.
Mutual Fund Investment
Mutual Fund InvestmentSaam TV
Published On

Mutual Fund Investment News:

पुढील आयुष्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी प्रत्येक जण आपल्या महिन्याच्या कमाईतील काही रक्कम बाजूला काढून ठेवतात. बचत करण्यासाठी अनेक जण विविध ठिकाणी गुंतवणूक देखील करतात. ही गुंतवणूक करून भरपूर प्रमाणात नफा मिळावा म्हणजेच रिटर्नमध्ये दुप्पट पैसे मिळावेत असं सर्वांनाच वाटतं. त्यासाठीच अनेक जण एसआयपी आणि म्युच्युअल फंडचीही निवड करतात. (Latest Marathi News)

म्युच्युअल फंड निवडताना योग्य प्लॅनची निवड करणे गरजेचं आहे. तुम्ही योग्य प्लॅनची निवड केल्यास कालांतराने तुम्हाला उत्तम परतावा मिळतो. अगदी १०० रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही तब्बल १ कोटींचे मालक देखील होऊ शकता. त्यामळे आज या बातमीतून अशाच काही म्युच्युअल फंडबद्दल जाणून घेऊ.

Mutual Fund Investment
Mutual Fund SIP: 4 हजार रुपयांची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्याधीश, मॅच्युरिटीच्या वेळी मिळू शकतात 2.2 कोटी

म्युच्युअल फंड निवडताना या गोष्टी तपासा

म्युच्युअल फंड निवडताना सर्वात आधी या फंडमधून किती रिटर्न मिळतील याची माहिती घ्यावी.

दरवर्षी शक्यतो १२ टक्के परतावा मिळणार म्युच्यु्अल फंड निवडावा.

या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला रोज फक्त १०० रुपये गुंतवावे लागतील.

रोजचे १०० म्हणजे महिण्याला ३००० रुपये द्यावे लागतील.

३० वर्षांसाठी ही गुंतवणूक सुरू ठेवल्यावर तुम्ही करोडपती व्हाल.

उदाहरणाद्वारे समजून घेऊ

दरवर्षी ३००० रुपये जमा केल्यावर तुमची रक्कम १०,८०,००० रुपये जमा होईल. जमा रकमेवर १२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळत असल्यास व्याज ९५,०९,७४१ रुपये इतके जमा होईल. त्यामुळे गुंतवलेली रक्कम आणि तुमची साठवलेली रक्कम मिळून तुमच्याकडे १,०५,८९,७४१ रुपये जमा होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com