स्मार्टफोनमध्ये मोटोरोला ही नावाजलेली कंपनी आहे. कंपनीचे स्मार्टफोन भारतात जास्त प्रमाणात विकले जातात. कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी नवीनवीन फोन आणि त्याचसोबत ऑफर लाँच करत असते. कंपनीने नुकतीच एका प्रीमियम स्मार्टफोनवर २० हजार रुपयांची सूट दिली आहे.
मोटोरोला कंपनीने Moto Razr 40 Ultra या स्मार्टफोनवर ही ऑफर दिली आहे. कंपनीने मागील वर्षी जुलैमध्ये हा फोन लाँच केला होता. कंपनीच्या या स्मार्टफोनची किंमत ८९,९९९ रुपये आहे. आता या फोनवर २० हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत आता ६९,९९९ झाली आहे. (Latest News)
कंपनीचा हा स्मार्टफोन उत्तम क्वालिटी, स्टोरेज आणि स्पेसिफिकेशनसह बाजारात उपलब्ध आहे. Moto Razr 40 Ultra या स्मार्टफोनमध्ये इन्फिनिट ब्लॅक, ग्लेशियर ब्लू, पीच फज आणि व्हिवा मॅजेन्टा हे चार कलर ऑप्शन्स देण्यात आले आहेत.
Moto Razr 40 Ultra हा कंपनीचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे. यात तुम्हाला ३.६ इंचचा FHD+ सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे तर ६.९ इंचचा FlexView FHD+ डिस्प्ले आहे. ज्याला 65Hz पर्यंतचा व्हेरिएबल रिफ्रेश रेट आणि 1400 nits पर्यंत ब्राइटनेस देण्यात आला आहे.
या डिव्हाइसमध्ये तुम्हाला ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जनरल 1 (Snapdragon) प्रोसेसर देण्यात आला आहे. जो 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. या डिव्हाइसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये 3,800mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 33W फास्ट चार्जिंग आणि 5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.