Namo Shetkari Yojana : खुशखबर! शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी ६ हजार रुपये; नमो शेतकरी योजना नक्की आहे तरी काय? जाणून घ्या

Maharashtra Government Namo Shetkari Yojana: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. त्याचप्रकारे राज्य सरकारने महाराष्ट्रात नमो शेतकरी योजना राबवली आहे.
 Namo Shetkari Yojana
Namo Shetkari YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या पीएम किसान योजनेप्रमाणेच राज्यात नमो शेतकरी योजना राबवली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत व्हावी, या दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांनी शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी योजना राबवली आहे. नमो शेतकरी योजनेचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो ते जाणून घेऊयात. (Maharashtra Government Namo Shetkari Yojana)

 Namo Shetkari Yojana
Atal Pension Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५००० रुपयांची पेन्शन मिळवा; सरकारची अटल पेन्शन योजना नक्की आहे तरी काय?

मोदी सरकारने २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात ६ हजार रुपये दिले जातात. प्रत्येकी २ हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने २०२३ मध्ये नमो शेतकरी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गतही महाराष्ट्राती शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी दोन वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून ६ हजार रुपये तर राज्य सरकारकडून ६ हजार मिळतात. त्याचसोबत १ रुपयामध्ये शेतीचा विमा दिला जातो. आतापर्यंत ६९०० कोटी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. (What Is Namo Shetkari Yojana)

 Namo Shetkari Yojana
PM Internship Scheme : ९०,८०० पेक्षा जास्त रोजगाराच्या संधी, आजपासून नोंदणी सुरू; कुठे आणि कसा कराल अर्ज, वाचा सविस्तर

नमो शेतकरी योजना पात्रता (Namo Shetkari Yojana Eligibility)

नमो शेतकरी योजनेअंतर्गत सरकारने काही अटी ठेवल्या आहेत. या योजनेत लाभ घेणारा व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच त्याच्याकडे शेती असणे आवश्यक आहे. शेतकरी महाराष्ट्रातील कृषी विभागात रजिस्टर असायला हवा. शेतकऱ्याचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असायला हवे. त्याचसोबत शेतकऱ्यांने किसान सन्मान निधी योजनेत रजिस्ट्रेशन केलेले असावे.

 Namo Shetkari Yojana
Post Office Saving Scheme : 115 महिन्यात पैसे होणार दुप्पट; पोस्ट ऑफिसची खास योजना, जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com