अनेक लोक कधी घाईत तर कधी चुकून आपलं महत्त्वाचं काम असल्याचं वाहन कुठेही पार्क करून काम पूर्ण करायला निघून जातात. मात्र परतल्यावर वाहन आपल्या जागेवर दिसत नाही. म्हणजे ट्रॅफिक पोलीस तुमची गाडी तेथून टो करून घेऊन जातात. याचे एक कारण म्हणजे वाहतूक नियमांचे योग्य ज्ञान नसणे. आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रॅफिक नियमांची माहिती देणार आहोत, जेणे करून तुम्ही अशा काही दंडापासून वाचू शकाल.
जर तुम्ही नो पार्किंग एरियात घाईत गाडी पार्क केली असेल, तरीही पोलीस लगेच येऊन तुमची गाडी घेऊन जाऊ शकत नाहीत. लाऊडस्पीकरवर इशारा देऊन काही वेळ वाहन मालकाची वाट पाहिल्यानंतर, मालक न आल्यासच पोलिस गाडी टो करू शकतात. यातच जर तुमचे काम काही मिनिटांचे असेल, तर तुम्ही काही वेळ गाडी पार्क करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
यातच जर तुम्ही कार नो पार्किंगमध्ये पार्क केली आणि कारमध्ये कोणीही बसलेलं असेल, तर पोलीस तुमच्यावर कारवाई करू शकत नाही. तसेच तुमची कार टोही करू शकत नाही. मात्र तुमच्या कारमुळे ट्राफिक होत असेल, तर पोलीस तुम्हाला कार तेथून हटवण्यास सांगू शकतात. तुम्ही कार हटवल्यास तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. (Latest Marathi News)
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अशा वाहनांवर रस्ता नियम 1989 च्या कलम 20 अन्वये कारवाई केली जाऊ शकते, ज्यामध्ये चालक उपस्थित नसतो. मात्र खराब झालेले वाहने, नोंदणीकृत ट्रेलर, साइड कार किंवा डिलिव्हरी वाहने इत्यादींना या नियमातून सूट देण्यात आली आहे.
सध्याच्या नियमांनुसार, ट्रॅफिक पोलीस नो पार्किंग एरियामध्ये उभ्या असलेल्या कारवर दंड आकारू शकते. ज्यासाठी वेगवेगळ्या दंडाच्या रकमेची तरतूद आहे. हे दंड ठिकाण आणि वाहनानुसार मोठ्या वाहनांपासून लहान वाहनांपर्यंत 2,000 ते 200 रुपये (दुचाकीसाठी) आकारले जाऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.