LPG Price: नव्या वर्षात गॅस सिलिंडर स्वस्त होणार? या देशाने थेट ५० टक्क्यांनी किंमती केल्या कमी

LPG Price Will Decrease: एलपीजी गॅसच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. रशियाने एलपीजी गॅसच्या किंमतीत ५० टक्क्यांनी कपात केली आहे.
LPG Price
LPG PriceSaam Tv
Published On

नवीन वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहे. नवीन वर्षात एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होऊ शकतो. १ जानेवारी २०२५ मध्ये सरकारी तेल कंपन्या सध्याच्या गॅसच्या दरांचे पुनरावलोकन करतील आणि नवीन किंमती जाहीर करतात. भारतात एलपीजी गॅसच्या किंमती वाढत आहेत. मात्र, अनेक राज्यांमध्ये तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. रशियाच्या मार्केटमध्ये तर एलपीजी गॅसची किंमत ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. (LPG Gas Price)

LPG Price
Flight Rule Change: फक्त एक हँडबॅग अन् ७ किलो वजन, विमान प्रवासाचे नियम बदलले, वाचा...

रशियामध्ये एलपीजी गॅसचा वापर जेवण बनवणे आणि कारमध्ये हिटिंग आणि पेट्रोकेमिकल्सच्या प्रोडक्शनसाठी करण्यात येतो.

मिडिया रिपोर्टनुसार, रशियामध्ये डिसेंबर २०२४ मध्ये एलपीजी गॅसच्या किंमत ५० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. नोव्हेंबरच्या शेवटी एलपीजी गॅसची किंमत 28000 Roubles होती. परंतु या किंमती कमी होऊन डिसेंबरमध्ये 14000 Roubles म्हणजेच १४० डॉलर झाली आहे. (LPG Gas Price Will Decrease)

रशिया हा युरोपीय देशांमध्ये एलपीजी गॅस एक्सपोर्ट करायचा. परंतु युरोपीय देशांनी आर्थिक प्रतिबंध लावल्यानंतर एलपीजी एक्सपोर्ट कमी झाला. त्यामुळेच एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल झाले आहे.रुसने नुकतेच चीन, मंगोलिया, अर्मिनिया, जॉर्जिया या देशांमध्ये एलपीजी गॅस एक्सपोर्ट करणे वाढवले आहे.

LPG Price
Post office Scheme: पोस्ट ऑफिसची खास योजना! महिना ११५ रुपये गुंतवा अन् १० लाख मिळवा; काही महिन्यातच पैसे होतील डबल

रशियाने एलपीजीच्या किंमती कमी केल्यानंतर भारतातील गॅसच्या किंमती कमी होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे. भारताने रशियाकडून याआधी कच्चे ते आयात केले आहे. फेब्रुवारी २०२२ नंतर रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यामुळे युरोपीय देशांनी रशियाकडून कच्चे तेल एक्सपोर्ट करणे बंद केलेआहे. त्यावेळी भारताने स्वस्त किंमतीत कच्चे तेल विकत घेतले होते.त्यामुळे आता भारत रशियाकडून एलपीसी गॅस एक्सपोर्ट करणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

LPG Price
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक करा अन् महिन्याला ९२५० मिळवा; जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com