
पहिल्या वहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम सज्ज झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खो-खो खेळाच्या उन्नतीसाठी भारतीय खो-खो महासंघाने पुरुष आणि महिला अशा दोन्ही विभागात सहभागी संघांची संख्या वाढवली आहे.
सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येकी १६ पुरुष, महिला संघ स्पर्धेत सहभागी होणार होते. परंतु, आता अनेक देशांची खेळण्याची उत्सुकता लक्षात घेता पुरुष विभागात २१ आणि महिला विभागात २० संघ सहभागी होणार आहेत.
आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ओशिनिया अशा सहा खंडातील देश या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होणारे देश -
आफ्रिका खंड
पुरुष - घाना, केनिया, दक्षिण आफ्रिका
महिला - केनिया, दक्षिण आफ्रिका, युगांडा
आशिया -
पुरुष - बांगलादेश, भूतान, भारत, इराण, मलवेशिया, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, श्रीलंका
महिला - बांगलादेश, भूतान, भारत, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नेपाळ, पाकिस्तान, दक्षिण कोरिया, श्रीलंका
युरोप -
पुरुष - इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅण्ड, पोलंड
महिला - इंग्लंड, जर्मनी, नेदरलॅण्ड, पोलंड
उत्तर अमेरिका -
पुरुष - अमेरिका
दक्षिण अमेरिका -
पुरुष - अर्जेंन्टिना, ब्राझील, पेरु
महिला - पेरु
ओशियाना विभाग -
पुरुष - ऑस्ट्रेलिया
महिला - न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया
विश्वचषक स्पर्धेच्या तयारीबाबत बोलताना भारतीय खो-खो महासंघङाचे अध्यक्ष श्री सुधांशु मित्तल म्हणाल, 'आम्ही परदेशी प्रतिनिधी लक्षात घेऊन सुविधा पुरवत आहोत. आम्ही आमच्या पाहुण्यांसाठी त्यांच्या आहाराच्या गरजेनुसार जेवण आणि आहार योजना तयार केली आहे. त्यांच्यासाठी योग्य मुक्काम आणि वाहतुक व्यवस्था चोख ठेवली आहे.
जेणे करुन त्यांना येथे राहताना कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागणार नाही. या पहिल्या स्पर्धेच्या निकालाची पर्वा न करता जगभरातील आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी ही स्पर्धा आदर्श ठरेल.'
विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा १३ जानेवारी रोजी होणार असून, त्यानंतर भारत वि. पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पहिला सामना होईल. त्यानंतर १४ ते १६ जानेवारी दरम्यान साखळी सामने पार पडतील.
पुढे उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीचे सामने अनुक्रमे १७ आणि १८ जानेवारीस होती. अंतिम सामना १९ जानेवारीला होणार आहे.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने अधिकृतपणे भारतीय खो-खो महासंघाला या स्पर्धेसाठी सहभागीदार होण्यास मान्यता दिली आहे. या स्पर्धेला सर्व पाठिंबा देण्यासाठी ते वचनबद्ध आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.