Vima Sakhi Yojana: महिलांना महिन्याला ७००० रुपये मिळणार, जाणून घ्या सविस्तर

LIC Vima Sakhi Yojana: केंद्र सरकारने महिलांसाठी खास विमा सखी योजना राबवली आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला ७००० रुपये मिळणार आहे.
Vima Sakhi Yojana
Vima Sakhi YojanaSaam Tv
Published On

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. सरकारी वीमा कंपनी एलआयसीने महिलांसाठी खास योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना ७००० रुपये मिळणार आहे.

एलआयसीच्या या योजनेचे नाव वीमा सखी योजना आहे. या योजनेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले जाते. या योजनेत एक वर्षात १ लाख महिलांना जोडण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या योजनेत ग्रामीण भागातील महिलांना वीमा एजंट बनवणाचे आणि ग्रामीण भागात जागरुकता निर्माण केली जाते. (LIC Vima Sakhi Yojana)

Vima Sakhi Yojana
EDLI scheme: EDLI योजनेच्या कालावधीत तीन वर्षांची वाढ, असा घेता येणार लाभ

LIC च्या वीमा सखी योजनेचे उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे आहे. या योजनेत १८ ते ७० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असावे.

काय आहे वीमा सखी योजना? (What Is LIC Vima Sakhi Yojana)

या योजनेत महिलांना महिन्याला ७००० रुपये मिळणार आहे. एका वर्षासाठी दर महिन्याला ७००० रुपये दिले जाणार आहे. यानंतर दुसऱ्या वर्षी ६००० रुपये दिले जाणार आहे.तिसऱ्या वर्षी महिलांना ५००० रुपये दिले जाणार आहेत. यानंतर सेल्सचा टार्गेट पूर्ण केल्यावर महिलांना अतिरिक्त कमिशनदेखील दिले जाणार आहे.

Vima Sakhi Yojana
Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना पहिला धक्का; पुणे जिल्ह्यातील १० हजार अर्ज ठरले अपात्र

या योजनेत महिलांना एलआयसीतर्फे ट्रेनिंगदेखील दिले जाणार आहे. पहिल्या तीन वर्षांत त्यांना विशेष ट्रेनिंग दिले जाणार आहे. ग्रॅज्युएट वीमा सखींना एलआयसी एजेंट म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.या योजनेत इच्छुक महिलांनी अर्ज करावेत.

Vima Sakhi Yojana
Government Scheme: तरुणांना मिळणार ५० लाखांची मदत, महाराष्ट्रातील रोजगार निर्मिती योजना नक्की आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com