
LIC ची जीवन शांती पॉलिसी
एकदा गुंतवणूक करुन मिळणार आयुष्यभर पेन्शन
वर्षाला १ लाखांची पेन्शन मिळणार
प्रत्येकजण आपल्या भविष्याच्या दृष्टीने आतापासून बचत करत असतात. आपल्या पगारातील काही रक्कम ते बचत करत असतात. ही रक्कम जर तुम्ही एखाद्या योजनेत गुंतवली तर तुम्हाला त्याचा खूप चांगला परतावा मिळेल. अशीच एक योजना म्हणजे एलआयी न्यू जीवन शांती प्लान. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरवर्षी १ लाखापर्यंतची पेन्शन मिळू शकते. त्यामुळे तुमचं भविष्य खूप सुरक्षित होईल.
एकदा गुंतवणूक करुन मिळणार आयुष्यभर पेन्शन (One Time Investment And Get Lifetime Pension)
एलआयसीच्या जीवन शांती योजनेत गुंतवणूक करुन तुम्हाला भविष्यात खूप फायदा होणार आहे. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला दर महिन्याला एक ठरावीक रक्कम मिळणार आहे. या योजनेत तुम्हाला पेन्शनची गॅरंटी मिळते.
एलआयसीच्या या योजनेत ३० ते ७९ वयोगटातील नागरिक लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोणत्याही प्रकारचा रिस्क कव्हर नाहीये. परंतु या योजनेत तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या योजनेत तुम्हाला डेफर्ड अॅन्युटी फॉर सिंगल लाइफ आणि डेफर्ड अॅन्युटी फॉर जॉइंट लाइफ असे दोन ऑप्शन मिळतात. या योजनेत तुम्हाला सिंगल प्लान किंवा कंबाइंड ऑप्शनमध्ये गुंतवणूक करु शकतात.
वर्षाला मिळणार १ लाखांची पेन्शन (1 Lakh Pension)
एलआयसी न्यू जीवन शांती योजनेत पेन्शन लिमिट ठरवू शकतात. या योजनेत जर ५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये जमा केले आणि हे पैसे पाच वर्षांसाठी होल्ड केले.तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आहे. तुम्हाला १,०१,८८० रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणार आहे. या योजनेत ६ महिन्यात ४९,९११ रुपये पेन्शन मिळणार आहे. याच हिशोबाने तुम्हाला ८,१४९ रुपये महिन्याला पेन्शन मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.