Petrol Diesel Rate (2nd March 2024) : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, मुंबई-पुण्यात १ लिटर पेट्रोलसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या

Petrol Diesel Price Today 2nd March 2024 : राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट करत असतात. मिळालेल्या माहितीनुसार काल कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
Petrol Diesel Rate (2nd March 2024)
Petrol Diesel Rate (2nd March 2024)Saam TV

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

राष्ट्रीय तेल कंपन्या दररोज पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट करत असतात. मिळालेल्या माहितीनुसार काल कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $83.62 वर आणि WTI क्रूड प्रति बॅरल $78.47 वर विकले जात आहे. परंतु, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत किरकोळ तफावत दिसून येत आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यासह इतर राज्यातील दर

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा (Petrol) दर ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर इतकी आहे. मुंबईसारख्या (Mumbai) शहरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०६.३१ रुपये (Price) तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे. तसेच कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Petrol Diesel Rate (2nd March 2024)
Highest Peak Of Maharashtra : सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, ट्रेकर्सप्रेमींचं आवडतं ठिकाणं

2. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.०१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.५३ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.८६ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.३६ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.५१ रुपये आणि डिझेलची किंमत ९३.०४ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.७५ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.४५ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com