
केंद्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहे. केंद्रासोबतच विविध राज्य सरकारनेदेखील योजना राबवल्या आहेत. दरम्यान, केंद्राची लखपती दीदी योजना ही खूप लोकप्रिय आहे. लखपती दीदी योजनेत महिलांना स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. याचसोबत लखपती दीदी योजनेत १ लाख ते ५ लाखांचे कर्ज दिले जाते.
लखपती दीदी योजना (Lakhpati Didi Scheme)
लखपती दीदी या योजनेत महिलांना कोणत्याही व्याजाशिवाय हे लोन दिले जाते. या योजनेत महिलांनी स्वतः चा व्यवसाय सुरु करावा. त्यांना रोजगार मिळावा, याचसोबत इतरांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करुन द्यावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे.
लखपती दीदी योजनेत कर्जासोबतच स्किल डेव्लपमेंट ट्रेनिंग प्रोगामअंतर्गत ट्रेनिंगदेखील दिले जाते. महिलांना स्किल ट्रेनिंग देऊन रोजगार निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अनेक क्षेत्रातील प्रोफेशनल ट्रेनर्सकडून प्रशिक्षण दिले जाते. ही योजनेत बचत गटातील महिला लाभ घेऊ शकतात.
लखपती दीदी योजनेत कोट्यवधि महिलांनी लाभ घेतला आहे. महिलांना स्किल ट्रेनिंगसोबतच आर्थिक मदत दिली जाते. १ ते ५ लाखांपर्यंतचे लोन दिले जाते. महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कर्जावर कोणतेही व्याजदर आकारले जात नाही.
लखपती दीदी योजना पात्रता
लखपती दीदी योजनेत १८ ते ५० वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या लाभार्थी महिला या भारतातील कोणत्याही राज्याच्या रहिवासी असाव्यात. तसेच महिला बचत गटाशी जोडलेल्या असणे आवश्यक आहे. महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे आणि बिझनेस प्लान जमा करावा लागेल. यानंतर अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, इन्कम प्रुफ हे कागदपत्रे आवश्यक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.