Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींचा लाभ बंद करणार; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या मार्गांनी योजनेचा लाभ घेतला. त्यांचा लाभ बंद करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanasaam tv
Published On
Summary

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

लाडकी बहीण योजनेच्या गैरवापरावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ बंद करणार

लाडकी बहीण योजनेत लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या बोगस लाडक्या बहि‍णींनी सरकारचे कोट्यवधी रुपये लाटले आहेत. याचसोबत अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या मार्गाने घेतलेला लाभ बंद करणार, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी सुरु आहे. ज्या लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेता आहे, त्यांचा लाभ बंद केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Ladki Bahin Yojana
Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

काल पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना २६ लाख महिलांनी योजनेचा गैरवापर करुन लाभ घेतला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, या प्रकरणात सरकारकडून चौकशी सुरु आहे. जे लाभार्थी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहे. त्यांचा लाभ थांबवण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी (Ladki Bahin Yojana Verification Process)

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन छाननी करत आहे. एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला आहे. त्यांच्यात कोणाला लाभ द्यायचा आणि कोणाला नाही हे कुटुंबप्रमुखाने ठरवायचे आहे. त्यानंतर पत्र लिहून द्यायचे आहे. यानंतर त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकीला ऑगस्ट अन् सप्टेंबरचा हप्ता एकत्र येणार? या दिवशी खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता

लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य (Ladki Bahin Yojana KYC Process)

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना आता केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी केल्यानंतरच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. केवायसी केल्यानंतर त्यातून महिलांची पडताळणी केली जाणार आहे. यातून ज्या महिला अपात्र ठरतील त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे गरजेचे आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु होईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी जमा होणार? ऑगस्टचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com