Ladki Bhain Yojana: 'ये ताई पैसे आले! लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये येण्यास सुरूवात

Ladki Bhain Yojana Installment: ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना सरकारकडून अर्थसहाय्य दिलं जातं. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे दिले जातात.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झालीय. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात. ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात झालीय.

पुढील दोन तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे येतील, अशी माहिती महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून दिलीय. राज्यात जर पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर आम्ही या योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू, लाभार्थी महिलांना दीड हजार ऐवजी २१०० रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी करण्यात आली होती.

मात्र अजूनही २१०० रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाहीये. अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी शक्यता होती. मात्र या अधिवेशनात देखील कुठलाही निर्णय झाले नाहीये, त्यामुळे २१०० रुपये कधी मिळणार याकडे आता राज्यातील महिलांचं लक्ष लागलंय.

पैसे बँक खात्यावर आले की नाही, नेमकं कसं तपासायचं?

पैसे अकाऊंटमध्ये आले आहेत की नाही? हे कसं चेक करायचं? जाणून घेऊ. तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये आले आहेत की नाही, हे जाणून घेण्यासाठी बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता. तसेच बँकिंग अॅपमधून स्टेटमेंट डाऊनलोड करुन पैसे आलेत की नाही हे चेक करा. जर तुम्ही ऑललाईन बँकिंगचा वापर करत नसाल तर बँकेत जाऊन खात्री करा

Ladki Bahin Yojana
Kisan Vikas Patra: ५ लाखांचे होतील १० लाख; पोस्टाच्या या योजनेत ११५ महिन्यात पैसे होतात डबल

ही प्रोसेस केल्यास खात्यात लगेच जमा होतील

लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागे अनेक कारणे असतात. यातील एक सर्वसामान्य कारण म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना जर तुम्ही काही चुका केल्या असतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुमचे बँक अकाउंट आणि आधार नंबर लिंक नसेल तरीही पैसे जमा होणार नाहीत. यासोबत तुमचे DBT स्टेटस हे ऑन असायला हवं.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना एप्रिल-मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार, खात्यात एकदम ₹३००० येणार?

जर तुमच्याही अकाउंटला पैसे आले नसतील तर त्याचे कारण DBT Enable नसेल. त्यासाठी DBT Enable करावे लागेल. हे ऑन करण्यासाठी npci.org.in वर जाऊन consumer वर क्लिक करा.तिथे तुम्हाला Bharat Aadhar Seeding Enable वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडींगवर क्लिक करावे. आधार मॅप स्टेट्‍सवर क्लिक केल्यानंतर आधार कार्डचा नंबर टाका. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचे DBT Status Enable आहे की नाही हे दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com