Ladki Bahin Yojana : बोगस लाडकीने लुटले 3000 कोटी? सरकारवर गुन्हे दाखल करा, विरोधकांची मागणी; VIDEO

Ladki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत... त्यातच आता तब्बल 30 लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारचे 3 हजार कोटी लुटल्याचं वृत्त समोर आलंय..हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि त्यावरुन कसा वाद पेटलाय? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.
Ladki Bahin Yojana News
Ladki Bahin Yojana NewsMeta Ai
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ladki Bahin Yojana : महायुतीची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता एक नवा वाद समोर आला आहे... राज्यात तब्बल 30 लाख लाडक्यां बहिणींनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला आहे. काय आहे हा दावा पाहूयात.

बोगस लाडकीने लुटले 3 हजार कोटी?

- 2 कोटी 46 लाख लाडकींना दर महिन्याला 3700 कोटींचा हप्ता

- राज्यात 2 कोटी 39 लाख लाडक्या दारिद्य्र रेषेखाली

- SGNPY,शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना लाभ

- 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ

- 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन

- 30 लाख अपात्र लाडकींना 3 हजार 700 कोटींचा लाभ

राज्यात 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट सरकारवरच एफआयआर दाखल करण्याची मागणी केलीय.

Ladki Bahin Yojana News
Maharashtra Kesari : पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला केलं चितपट

एकीकडे राज्याच्या तिजोरीत 1 लाख 10 हजार कोटींची तूट आहे.. त्यामुळे सरकारने योजनांच्या मुल्यांकनाचा निर्णय घेतलाय.. त्यातच लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते देण्यात आले आहेत. तर सातव्या हप्त्याचं वाटप सुरु झालं आहे. सरकारने लाडक्या बहिणींची पडताळणी सुरु केलीय. एवढंच नाही तर श्रीमंत लाडक्यांनी पैसे परत कऱण्याचं आवाहनही सरकारने केल आहे. मात्र आत्ता तब्बल 30 लाख लाडक्यांनी 3 हजार कोटी लुटल्याचं समोर आल्याने सरकार या लाडक्यांकडून पैसे वसुल करणार का? याकडे लक्ष लागलंय.

Ladki Bahin Yojana News
Mamta Kulkarni : ममताचा संन्यास, आखाड्यांचा संताप, श्री यमाई ममता नंदगिरीवरून वाद टोकाला; पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com