Krushi Vibhag Bharti 2023: तरुणांसाठी आनंदाची बातमी; कृषी विभागातील तब्बल ९५२ पदांसाठी भरती

Krushi Vibhag Krushi Sevak Recruitment 2023 : कृषी सेवक पदासाठी ९५२ जागा भरण्यात येणार आहे.
Krushi Vibhag Bharti
Krushi Vibhag Bharti Saam Tv
Published On

Maharashtra Government Job :राज्यातील कृषी विभागात काम करण्यासाठी इच्छुकांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत .राज्यातील कृषी विभागातील रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. कृषी सेवक पदासाठी ९५२ जागा भरण्यात येणार आहे.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासाठी ही भरती केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे , ठाणे या ठिकाणी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या जागेसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख ३१ ऑगस्ट २०२३ आहे.

Krushi Vibhag Bharti
IRCTC Fake App Alert : IRCTC चा ग्राहकांना इशारा! बनावट रेल्वे अॅपद्वारे लोकांची फसवणूक, काय घ्याल काळजी

1. कोणत्या जिल्ह्यात किती पदासांठी भरती?

औरंगाबाद- १९६

लातूर-१७०

नाशिक- ३३६

कोल्हापूर-२५०

अमरावती- १५६

नागपूर- ३६५

पुणे- १८२

ठाणे -२४७

Krushi Vibhag Bharti
Swadhar Yojana: उच्च शिक्षणासाठी सरकार देत आहे 43 हजार, जाणून घ्या काय आहे ‘स्वाधार’ योजना

2. किती मिळणार वेतन?

  • कृषी विभागातील कृषी सेवक पदांसाठी प्रति महिना १६ हजार रुपये वेतन देण्यात येणार आहे. हे वेतन कृषी सेवक पदासाठी हे वेतन निश्चित करण्यात आले आहे.

3. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराकडे कृषी विषयांमधील पदवी असणे आवश्यक आहे.

  • निवड झालेल्या उमेदवाराची कृषी सेवक पदी एका वर्षासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवाराच्या कामानुसार पुढील दोन वर्षे पुन्हा नियुक्ती करण्यात येणार असून कृषी सेवक पदी काम करण्याचा कालावधी तीन वर्षांचा असेल.

Krushi Vibhag Bharti
PM Vishwakarma Scheme : ५ टक्के व्याजदरानं मिळणार कर्ज, काय आहे पीएम विश्वकर्मा योजना?

4. कुठे आणि कसा कराल अर्ज

इच्छुक उमेदवारांना कृषी सेवक पदासाठी कृषी विभागाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील. कागदपत्रे जोडल्यावरच अर्ज दाखल केला जाईल. या संदर्भातील सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com