Jio-Airtel-Vi यूजर्ससाठी खास टिप्स! महागलेले रिचार्ज प्लॅन टाळा, 'या' सोप्या ट्रिक्सचा वापर करा अन् मोबाईल डेटा वाचवा

Data Saving Hacks: फोनवरील दैनंदिन डेटा पटकन संपत असेल, तर काही सोप्या उपायांनी तुम्ही तो वाचवू शकता. टेलिकॉम कंपन्यांचे महागडे प्लॅन टाळण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरतील.
मोबाइल इंटरनेट दरवाढीमुळे ग्राहकांवर आर्थिक ताण, सोप्या सेटिंग्ज आणि सवयींमुळे डेटा वाचवता येतो
SAVE DAILY MOBILE DATA: AIRTEL, JIO, VI USERS FACE HIGHER COSTS
Published On
Summary
  • एअरटेल, जिओ आणि व्हीआयने प्लॅन महाग केल्याने ग्राहकांवर आर्थिक भार.

  • १ जीबी दैनिक प्लॅन बंद, १.५ जीबी प्लॅनसाठी दरमहा ३०० पेक्षा जास्त खर्च.

  • व्हॉट्सअ‍ॅप ऑटो डाउनलोड बंद, डेटा सेव्हर मोडचा वापर फायदेशीर.

  • एचडीऐवजी सामान्य गुणवत्तेत व्हिडिओ पाहिल्यास डेटा जास्त काळ टिकतो.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात एअरटेल, जिओ आणि व्हीआय या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे दर वाढवले. यानंतर ग्राहकांना इंटरनेट डेटा पॅकसाठी पूर्वीपेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. अनेक ऑपरेटर्सनी १ जीबी दैनिक डेटा असलेले प्लॅन बंद केले आहेत.

सध्या १.५ जीबी डेटा असलेल्या प्लॅनसाठीही ग्राहकांना महिन्याला ३०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो. त्यामुळे २ जीबी दैनिक डेटा घेणारे अनेक यूजर्स खर्च वाचवण्यासाठी १.५ जीबी प्लॅनची निवड करत आहेत. वाढत्या दरांमुळे ग्राहकांमध्ये हा पर्याय लोकप्रिय ठरत आहे.

मोबाइल इंटरनेट दरवाढीमुळे ग्राहकांवर आर्थिक ताण, सोप्या सेटिंग्ज आणि सवयींमुळे डेटा वाचवता येतो
Apple AirPods Pro 3: इंग्रजी असो की Chinese फटाफट द्याल उत्तरं; भाषेच्या ज्ञानासह देईल Health अपडेट, धमाल आहे अ‍ॅपलचे AirPods

दररोजचा डेटा मर्यादित असल्याने तो पूर्ण दिवस पुरावा यासाठी ग्राहकांनी काही उपाययोजना करणं गरजेचं झालं आहे. मर्यादित डेटा पूर्ण दिवस टिकावा यासाठी काही सोप्या सवयी महत्त्वाच्या ठरतात. काही सोप्या ट्रिक्स खालीलप्रमाणे आहेत:

मोबाइल इंटरनेट दरवाढीमुळे ग्राहकांवर आर्थिक ताण, सोप्या सेटिंग्ज आणि सवयींमुळे डेटा वाचवता येतो
Budget Earbuds: OPPO Enco Buds 3 Pro वर धमाकेदार ऑफर; त्वरीत करा ऑर्डर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

1. मोबाईलमधील अ‍ॅप्स आणि ऑपरेटिंग सिस्टममधील ऑटो अपडेट्स बंद करून केवळ वाय-फायद्वारे अपडेट्स डाऊनलोड केल्यास डेटा वाचवता येतो.

2. त्याचप्रमाणे, व्हॉट्सअॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओंचे ऑटो डाउनलोडिंग बंद केल्याने अनावश्यक डेटा वापर टाळता येतो.

3. फोनच्या सेटिंग्जमधील डेटा सेव्हर मोड वापरल्यास बॅकग्राऊंडमध्ये डेटा खर्च होणार नाही आणि तो फक्त गरजेच्या वेळीच वापरला जाईल.

4. याशिवाय, व्हिडिओ पाहताना एचडीऐवजी सामान्य गुणवत्तेत स्ट्रीमिंग केल्यास डेटा दीर्घकाळ टिकतो. या छोट्या सवयी अंगीकारल्यास यूजर्स दैनंदिन इंटरनेट खर्चावर नियंत्रण ठेवू शकतात.

मोबाइल इंटरनेट दरवाढीमुळे ग्राहकांवर आर्थिक ताण, सोप्या सेटिंग्ज आणि सवयींमुळे डेटा वाचवता येतो
Jio VoLTE-VoNR: Jio ने सुरु केली नवीन सेवा; VoLTE की VoNR? नवीन 5G सेवेत कोणता फरक जाणून घ्या
Q

टेलिकॉम कंपन्यांनी १ जीबी दैनिक डेटा प्लॅन का बंद केले?

A

कंपन्यांनी महसूल वाढवण्यासाठी १ जीबी प्लॅन बंद करून १.५ जीबी किंवा त्यापेक्षा जास्त डेटा असलेले महागडे प्लॅन सुरू केले आहेत.

Q

१.५ जीबी प्लॅनसाठी किती खर्च करावा लागतो?

A

सध्याच्या स्थितीत सर्वात स्वस्त १.५ जीबी दैनिक डेटा प्लॅनसाठी ग्राहकांना दरमहा ३०० रुपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागतो.

Q

दैनंदिन डेटा लवकर संपत असल्यास काय करावे?

A

अ‍ॅप्स आणि सिस्टमचे अपडेट्स केवळ वाय-फायवर डाउनलोड करावेत, व्हॉट्सअॅपवरील फोटो-व्हिडिओ ऑटो डाउनलोड बंद करावे, तसेच डेटा सेव्हर मोड चालू ठेवावा.

Q

व्हिडिओ पाहताना डेटा कसा वाचेल?

A

एचडीऐवजी सामान्य गुणवत्तेत व्हिडिओ पाहिल्यास डेटा कमी खर्च होतो आणि पूर्ण दिवस टिकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com