ITR Return: रिफंडसाठी चुकीचा दावा करणे पडू शकते महागात! आयकर विभागाने अनेक कंपन्यांनी पाठवली नोटीस

Income Tax Department: इन्कम टॅक्सचे पैसे वाचवण्यासाठी अनेक लोक खोटे दावे करतात आणि इन्कम टॅक्स रिटर्न अर्ज करतात. मात्र, आता इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी खोटे दावे करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ITR News
ITR NewsSaam Tv
Published On

Income Tax Return :

इन्कम टॅक्सचे पैसे वाचवण्यासाठी अनेक लोक खोटे दावे करतात आणि इन्कम टॅक्स रिटर्न अर्ज करतात. अनेकदा लोक या मार्गाने पैसे वाचवण्यात यशस्वी होतात. मात्र, आता इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी खोटे दावे करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. (Latest News)

एनबीटीच्या वृत्तानुसार, जर कोणी कर वाचवण्यासाठी एचआरए (HRA), हेल्थ इन्शुरन्स (Health Insurance ), होम लोन (Home Loan )आणि 80C द्वारे कर टॅक्स भरण्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा किंवा खोटे बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. TDS आणि आयकर विभाग (Income Tax Department) इन्कम टॅक्स फॉर्ममध्ये काही चुकीची माहिती भरली आहे का हे शोधण्यासाठी काम करत आहे.

आयकर विभाग TDS आणि ITR फॉर्ममध्ये काही चुकीची किंवा खोटी माहिती भरली असेल तर ते शोधण्यासाठी एक तंत्र वापरत आहे. डिसेंबरमध्ये यासंदर्भात कलम 133 अंतर्गत मुंबई, दिल्लीसह इतर शहरांतील मोठ्या कंपन्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. आयकर विभागाने ही कारावाई केली आहे. आयकर विभाग संपूर्ण माहितीची पडताळी करण्यासाठी ही नोटीस पाठवू शकतो. याद्वारे त्यांना अचूक माहिती देण्यास सांगितले जाईल.

ITR News
Mumbai To Ayodhya Flight: 'मायानगरी ते रामनगरी'; दिल्ली,अहमदाबादनंतर आता मुंबईहून 'ही' विमानसेवा सुरू

जे लोक कर वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. किंवा चुकीची माहिती देऊन कर भरत नाही, या लोकांविरोधात कारवाई करण्याचा यामगचा मुख्य उद्देष आहे.

कायद्यानुसार अचूक TDS भरणे ही कंपनीची जबाबदारी आहे. मात्र, कंपन्या याकडे फार लक्ष देत नाही. अनेक प्रकरणांमध्ये कर्मचारी कागदपत्रे वेळेवर सादर करत नाही. त्यामुळे चुकीची माहिती पाठवली जाते. हे शोधण्यासाठी आयकर विभागा प्रयत्नशील आहे. ज्या कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांनी वेळेत उत्तर द्यावे. अन्यथा त्यांना दंड भरावा लागू शकतो.

ITR News
Petrol Diesel Rate (27th December): मुंबई-पुण्यासह नागपूरमध्ये पेट्रोल- डिझेलचा आजचा भाव किती? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com