Success Story: १६ सरकारी नोकरी सोडल्या, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक, IPS तृप्ति भट्ट यांचा प्रवास

Success Story of IPS Tripti Bhatt: आयपीएस तृप्ति भट्ट यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली. यूपीएससी परीक्षेसाठी त्यांनी १६ सरकारी नोकरी सोडल्या आहेत.
Success Story
Success StorySaam Tv
Published On
Summary

IPS तृप्ति भट्ट यांचा प्रेरणादायी प्रवास

१६ सरकारी नोकरी सोडल्या

पहिल्या प्रयत्नात क्रॅक केली यूपीएससी

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस, आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दरम्यान, यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकजण चांगली नोकरी करत असतात. परंतु तरीही त्यांच्या मनात सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याची इच्छा असते. त्यामुळे ते नोकरी सोडून परीक्षेची तयारी करतात. असंच काहीसं उत्तराखंडच्या तृप्ति भट्ट यांन केलं आहे.

Success Story
Success Story: ९ वर्षांची मेहनत, ८ वेळा अपयश, लग्नासाठी दबाव; कठीण परिस्थितीवर मात करत केली MPPSC क्रॅक; DSP मयंका चौरसिया यांचा प्रवास

तृप्ति भट्ट यांना एक दोन नव्हे तर १६ सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली होती. परंतु तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.

तृप्ति भट्ट या मूळच्या उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्याच्या रहिवासी आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी पंतनगर विद्यापीठातून इंजिनियरिंग पूर्ण केले.

१६ सरकारी नोकरी सोडल्या

तृप्ति भट्ट यांनी इंजिनियरिंग केल्यानंतर त्यांना एनटीपीसीमध्ये नोकरी मिळाली. याचसोबत त्यांना इस्त्रोमध्येही नोकरी करण्याची संधी मिळाली होती. परंतु त्यांच्या मनात सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचे स्वप्न होते. त्यांनी जवळपास १६ सरकारी सोडल्या.

पहिल्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक

तृप्ति यांचा हा निर्णय खूप अवघड होता. त्यांनी विश्वास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी २०१३ मध्ये पहिल्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.त्यांना ऑल इंडिया रँक १६५ प्राप्त झाली. त्या आयपीएस अधिकारी झाल्या.

Success Story
Success Story: शिक्षणासाठी जमीन विकली, मोठ्या जिद्दीने UPSC केली क्रॅक ; IPS नुरूल हसन यांचा प्रवास

यूपीएससी परीक्षा ही खूपच अवघड परीक्षा असते. या परीक्षेसाठी दिवसरात्र एक करुन अभ्यास करावा लागतो. या परीक्षेत अनेकदा अपयश येते परंतु कितीही अपयश आले तरीही हार मानायची नसते. तुम्ही सतत प्रयत्न केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. हाच प्रवास तृप्ति भट्ट यांचा आहे.

Success Story
Success Story: सलग दोनदा UPSC क्रॅक; इंटरव्ह्यूमध्ये विचारला होता 3 इडियट्सचा प्रश्न; IPS मोहन शक्ती अवस्थी आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com