Honasa Consumer IPO : पैसे जमा करुन ठेवा, शिल्पा शेट्टीच्या कंपनीत गुंतवणुकीची संधी; Mamaearth ब्रँड लवकरच IPO आणणार
New IPO : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. IPO मध्ये गुंतवणूक करुन गुंतवणूकदार कमी वेळेत जास्त कमाई करु शकतात. अशी एक संधी आता गुंतवणूकदारांना मिळणार आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची गुंतवणूक असलेल्या मामा अर्थ आणि द डर्माची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेडच्या (honasa consumer ipo) आयपीओला बाजार नियामक सेबीने मान्यता दिली आहे.
लवकरच या कंपनीचा IPO बाजारात येणार आहे. यावर्षी मार्चमध्येच मामा अर्थच्या होनासा कन्झुमर लिमिटेडचा आयपीओ आणण्याची योजना होती. परंतु बाजारातील परिस्थितीमुळे तो आणला नाही.
होनासा कंझ्युमर लिमिटेड, मामा अर्थच्या (Mamaearth) मालकीच्या कंपनीच्या कागदपत्रांनुसार, 400 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स आणि भागधारकांना 4,68,19,635 शेअर्स IPO द्वारे विकले जातील. वरुण अलघ, गझल अलघ, शिल्पा शेट्टी, रोहित कुमार बन्सल, सोफिना व्हेंचर्स आणि कुणाल बहल हे कंपनीचे सह-संस्थापक आणि प्रमोटर्स आहेत. (Live News Update)
शिल्पा शेट्टीने 2018 मध्ये कंपनीचे 16 लाख शेअर्स खरेदी केले. एका शेअरसाठी तिला 41.86 रुपये खर्च करावे लागले. कंपनीत शिल्पाची एकूण भागिदारी 0.52 टक्के आहे.
मामा अर्थ ची सुरुवात 2016 मध्ये वरुण आणि गझल अलग यांनी केली होती. यावर्षी जानेवारीमध्ये या कंपनीला युनिकॉर्न टॅग मिळाला. मार्च 2022 मध्ये कंपनीचा संपूर्ण नफा 14 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीचा महसूल 943 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. (Latest Marathi News)
IPO कसा खरेदी कराल
शिल्पा शेट्टीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा IPO खरेदी करण्यासाठी डिमॅट खाते असणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही ब्रोकिंग फर्ममध्ये डीमॅट खाते उघडू शकता. IPO जारी करणारी कंपनी आपला IPO 3-10 दिवसांसाठी गुंतवणूकदारांसाठी उघडते. त्या दिवसांमध्ये गुंतवणूकदार कंपनीच्या साईटला भेट देऊन किंवा ब्रोकरेज फर्मच्या मदतीने IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.
(डिस्क्लेमर : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमच्या अधिन आहे, त्यामुळे कुठे पैसा गुंतवण्यापूर्वी विचार करून तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.