Multibagger Stock : ५० रुपयांच्या शेअर्सने गुंतवणूकदार मालामाल; अवघ्या ३ वर्षांत लाखाचे झाले 1,900,000 रुपये

Multibagger Stock update : शेअर बाजारात ५० रुपयांच्या शेअर्सने कमाल केलीये. या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालमाल झाले आहेत.
Share market News
Share market Saam tv
Published On

Multibagger Stock : शेअर बाजारात एका ५० रुपयांच्या शेअर्सने कमाल केली आहे. Colab Platforms नावाच्या शेअरने गुंतवणूकदारांना मालमाल केलं आहे. या शेअरने बाजारात धुमाकूळ घातला आहे. या कंपनीने काही दिवसांपूर्वी ई-स्पोर्ट्स बाजारात एन्ट्री केली होती. आता कंपनी डिजिटल फर्स्ट जनरेशनसाठी प्लेयर फर्स्ट प्लॅटफॉर्म विकसित करत आहे. शेअरने मागील तीन ते पाच वर्षांत गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे. या कंपनीच्या शॉर्ट टर्म शेअरनेही कमाल केली आहे.

Share market News
Shashikant Shinde : मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष, VIDEO

Colab Platforms च्या शेअरने ऑक्टोबर २०२४ मध्ये ५२ आठवड्यांच्या निचांकी स्तर ५.४२ रुपये इतका गाठला होता. मे २०२५ महिन्यात या शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर गाठला आहे. बीएसई डेटानुसार, सध्या कंपनीच्या शेअरची किंमत ४३.९८ रुपये इतकी आहे. कंपनीने मागील ५ वर्षांत ४२९ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी शेअरने १८० टक्के परतावा दिला आहे. या कंपनीच्या शॉर्ट टर्म शेअरनेही गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या शेअरने अवघ्या एका महिन्यात ५० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

Share market News
Badlapur : बदलापूर रेल्वे स्थानकात वंदे भारतसह सर्व एक्स्प्रेस थांबणार? टर्मिनस दर्जाचा मुद्दा थेट रेल्वेमंत्रालयात पोहोचला

Colab Platforms या शेअरने गुंतवणूकदारांना अवघ्या ३ वर्षांत १९५५ टक्क्यांचा परतावा दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल, तर त्यांची गुंतवणूक आज वाढून १९ लाख ५५ हजार रुपये झाली असेल. गुंतवणूकदाराने मागील ५ वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असेल, तर त्याची गुंतवणूक ४२ लाख ९८ हजार रुपये झाली असेल.

Share market News
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; ११ आरोपींविरोधात १,६७० पानी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

कंपनीने गुंतवणूकदारांना तगडा परतावा दिला आहे. अनेक गुंतवणूकदार बाजारात घसरण झाल्यानंतर घाबरून जातात. मात्र, जे गुंतवणूकदार संयम दाखवतात. त्याच गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळतो.

टीप : या लेखातील माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे कोणत्याही शेअरमध्ये गुंतवणूक करण्यााआधी आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com