IRCTC Super App: IRCTC नाही इथं बूक करा ट्रेन तिकीट, डिसेंबरपासून रेल्वेची सगळी सिस्टिमच बदलणार!

Indian Railways Ticket Booking: रेल्वेसाठीचे तिकीट बूक करण्यासाठी पुढील महिन्यात एक नवीन ॲप लॉन्च होणार आहे अशी अपेक्षा आहे. हे ॲप सुरू झाल्यानंतर प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सुविधा मिळणार असून, प्रवाशांची खूप सोय होणार आहे.
IRCTC Super App
IRCTC app Saam Tv
Published On

भारतीय रेल्वेचे जगात चौथ्या क्रमांकाचे तसेच मोठे नेटवर्क आहे. दररोज धावणाऱ्या रेल्वेने हजारो लाखो लोक त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. रेल्वे प्रशासन डिसेंबरच्या अखेरीस सुपर ॲप लॉन्च करण्याचा विचार करत आहेत. या सिंगल ॲपद्वारे तिकीट बुकिंग, फूड डिलिव्हरी आणि ट्रेनची स्थिती तपासली जाऊ शकते. या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. तसेच रोजच्या चेंगराचेंगरीपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. चला जाणूया त्या अ‍ॅपबद्दलची माहिती.

नवीन ॲप IRCTC शी लिंक केले जाईल

नवीन ॲप प्रवाशांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हे CRISने तयार केले आहे आणि तिकीट बुकिंग वेबसाइट IRCTC शी लिंक केले आहे. हे ॲप सुरू झाल्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक सुविधा मिळणार असून रेल्वेलाही त्याचा फायदा होणार आहे. CRIS ही एक संस्था आहे जी रेल्वेसाठी तांत्रिक गोष्टींमर काम करते.

याशिवाय सध्या आयआरसीटीसीच्या ॲप आणि वेबसाइटद्वारे तिकिटांचे ऑनलाइन बुकिंग केले जाते. रेल्वेकडून लवकरच सुरू होणाऱ्या सुपर ॲपमुळे तिकीट बुकिंगपासून इतर अनेक कामे सुलभ होणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत हे ॲप लॉन्च होण्याची शक्यता आहे. IRCTC CRIS आणि ट्रेनचे तिकीट घेणारे प्रवासी यांच्यातील इंटरफेस म्हणून काम करत राहील. सुपर ॲप आणि आयआरसीटीसी यांच्यात नियोजनबद्ध पद्धतीने एकत्रीकरणाचे काम सुरू आहे.

रेल्वे प्रवासी सध्या 'या' ॲप्सचा वापर करतात

नवीन ॲपमध्ये प्रवाशांचे तिकीट-प्लॅटफॉर्म तिकीट बुक करणे आणि ट्रेनची स्थिती तपासणे अशा अनेक सुविधा असतील. रेल्वे प्रवाशांना सध्या IRCTC Rail Connect (रेल्वे तिकीट बुकिंग, बदल आणि रद्द करण्यासाठी), IRCTC ई-कॅटरिंग फूड ऑन ट्रॅक (रेल्वे सीटवर जेवण ऑर्डर करण्यासाठी), रेल मदाद (तक्रारींसाठी) यासारख्या विविध ॲप्स आणि वेबसाइट्सवर प्रवेश आहे. UTS (आसनाविना तिकीट बुक करण्यासाठी) आणि राष्ट्रीय ट्रेन चौकशी प्रणाली (ट्रेनची स्थिती जाणून घेण्यासाठी) इत्यादींचा वापर करावा लागेल.

IRCTC चे ॲप सध्या 10 कोटींहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे

IRCTC Rail Connect हे रेल्वे प्रवाशांमध्ये सर्वात लोकप्रिय ॲप आहे, ते 10 कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी डाउनलोड केले आहे. आरक्षित रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सध्या हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, आयआरसीटीसी सुपर ॲपला कमाईचे नवीन साधन मानले जात आहे. तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट एखाद्या खाजगी कंपनीमार्फत बुक केले तरीही ती कंपनी बुकिंगसाठी IRCTC चा वापर करते.

गेल्या वर्षी IRCTC ने 4,270 कोटी रुपये कमावले आणि 1,111 कोटी रुपयांचा नफा कमावला. या कमाईपैकी 30% कमाई फक्त तिकीट बुकिंगमधून होते. यूटीएस ॲप एक कोटीहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. हे ॲप प्रामुख्याने प्लॅटफॉर्म तिकीट आणि सीझन पास खरेदी करण्यासाठी वापरले जाते. CRIS रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठी सॉफ्टवेअर तयार आणि देखरेख करते.

Written By: Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com