India Bike Week: स्पोर्ट्स, इलेक्ट्रिक आणि मायलेज बाईक; गोव्यात रंगणार ऑटो शोचा महाकुंभ; 8 जबरदस्त दुचाकी होणार लॉन्च

India Bike Week 2023 : येत्या आठवड्यात नवनवीन बाईक लाँच होणार आहे. भारतातील सर्वात मोठा इंडिया बाइक वीक २०२३ (India Bike Week 2023) इव्हेंट गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमात नवनवीन बाईक लाँच होणार आहे.
Bike
BikeSaam Tv
Published On

India Bike Week 2023 New Bike Launch :

येत्या आठवड्यात नवनवीन बाईक लाँच होणार आहे. भारतातील सर्वात मोठा इंडिया बाइक वीक २०२३ (India Bike Week 2023) इव्हेंट गोव्यात होणार आहे. या कार्यक्रमात नवनवीन बाईक लाँच होणार आहे. कावासाकी ते ट्रायम्फ यासारख्या ब्रँडच्या बाईक या कार्यक्रमात लाँच केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात गोगोरो आणि सिंपर या इलेक्ट्रिक स्कूटरदेखील लाँच होणार आहे. या कार्यक्रमात अनेक नवनवीन बाईक लाँच होणार आहे.

Kawasaki Ninja ZX-6R

Kawasaki Ninja ZX-6R या बाईकचे अपडेटेड व्हर्जन ९ डिसेंबर म्हणजेच उद्या लाँच होणार आहे.या बाईकची किंमत १२.५ लाख रुपये असेल. या बाईकमध्ये अनेक कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले आहे. या बाईकमध्ये 636cc इन-लाइन 4 सिलिंडर इंजिन मिळते. हे इंजिन 129bhp पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करते.

Triumph Stealth Editions

ट्रायम्फ मोटारसायकल कंपनी भारतात आपली नवीन बाइक लाँच करणार आहे. कंपनी Scrambler 400X बाईक लाँच करणार आहे.

Kawasaki W175

कावासाकी कंपनी लवकरच Kawasaki W175 नवीन बाईक लाँच करणार आहे. कॉस्मेटिक्स अपडेट्स आणि ग्राफिक्ससह ही बाईक लाँच होणार आहे. या बाईकमध्ये अनेक नवीन अपडेट्स मिळणार आहेत.

Kawasaki Eliminator

IBW इव्हेंटमध्ये, Kawasaki Eliminator 450 लाँच होणार आहे. या बाईकमध्ये 451cc लिक्विड कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिनसह येणार आहे. हे इंजिन 45bhp पॉवर आणि 42.6Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Bike
Pan-Aadhaar Link ची मोठी अपडेट! घर खरेदी करणे होणार कठीण? मोजावे लागतील अधिक पैसे

Aprillia RS 457

भारतात बनवलेली Aprillia RS 457 बाईक या इव्हेंटमध्ये लाँच होणार आहे. या बाईकची किंमत ३.८ लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

Gogoro CrossOver

Gogoro CrossOver ही स्कूटर १२ डिसेंबर २०२३ रोजी लाँच होऊ शकते. ही स्कूटर २०२३ मध्ये जागतिक पातळीवर लाँच करण्यात आली आहे. या बाईकमध्ये 7.4kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे.

Dot One

Simple ब्रँड लवकरच आपली Dot One इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लाँच करणार आहे. येत्या १५ डिसेंबरला ही स्कूटर लाँच केली जाईल. या स्कूटरची किंमत १ लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Yamaha R3 आणि MT03

१५ डिसेंबरला भारतात Yamaha R3 आणि Yamaha MT03 ही बाईक लाँच करण्यात येणार आहे. या बाईकमध्ये अनेक अपडेटेड फिचर्स देण्यात येणार आहे.

Bike
RBI ने UPI ट्रांजेक्शन लिमिटमध्ये केली वाढ, ५ लाख रुपयांपर्यंत करता येणार पेमेंट; नियमही लागू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com